सर्वच देशात फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा हा सर्वांनाच खूप आवडतो.अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आंबा हा सर्वांनाच खूप आवडतो. आंबा हा चवीने थोडा आंबट थोडा गोड. हे मधुर रसाळ फळ आहे.आंबा हा विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड. आंब्याला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. आंब्याचा सीझन हा एप्रिल ते जून मध्ये असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अजुन पण माहीत नाही.परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशिया मध्ये मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील 250 ते 300 लक्ष वर्षांचा जिवंत इतिहास पाहता आंब्याचा उगम तिथच झाला अस मानण्यात येते. सर्वात जास्त मागणी ही हापूस आंब्याला असते. आंबा हा दोन प्रकारचा असतो एक कच्चा आंबा आणि एक पिकेल आंबा. आंब्याच्या अनेक जाती आहेत. नीलम आंबा केशर कलमी, लंगडा, दशेरी तोतापुरी आंबा हापुस अशा अनेक जाती आहेत.आंबा हा सर्वांचाच खूप लाडका असल्यामुळे हा सर्वात अपेक्षित हंगाम आहे जगभरामध्ये पाचशेहून अधिक प्रकारचे आंबे हे बाजारांमध्ये विकायला येतात . ते रंग, रूप ,गंध या मुळे प्रसिद्ध आहेत.
जगाच्या उत्पादनापैकी भारतात आंब्याचे 56 टक्के उत्पादन होते .भारतात जवळजवळ तेराशे जातीची नोंद आहे. परंतु पंचवीस ते तीस जाती हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. दक्षिण आशिया मध्ये हजार वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येते .दक्षिण आशियात आता भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. आंब्याची पाने अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमात आपण सजावटीसाठी वापरतो तसेच दसरा-दिवाळी यासाठी आपण आंब्याची पाने तोरणे म्हणून वापरतो. आंब्याला आपले हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. आंब्याच्या पानांचा वापर हा शुभ ठिकाणी केला जातो .आंब्याला शुभचिंतक मानले आहे. आंब्याचे झाड हे साधारणपणे 35 ते 40 मीटर उंच असते त्याचा घेर साधारणपणे दहा मीटर एवढा असतो .
आंब्याचा उपयोग तसा खाण्यासाठी तर केला जातोच परंतु कच्च्या आंब्याचा उपयोग हा लोणचे टाकण्यासाठी पण करतात , आपल्याकडे आंब्याचे लोणचे हे खूप प्रसिद्ध आहे. आंब्याचे खूप उपयोग देखील आहेत. काही लोक तर त्याची भाजी पण करतात तसेच आयुर्वेदात तर आंब्याची साल, पाने फुले चे देखील महत्व सांगितले गेले आहे. असा हा गुणकारी आंबा अनेक रोगांवर उपचार म्हणून उपयोगी ठरतो. आंब्याचा मोहर थंड रुची उत्पन्न करणारा असून, अतिसार रक्तदोष आणि कफ दूर करणारा पण आहे कैरी मध्ये आम्लता आणि क्षारांचे प्रमाण खूप असते. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो ,म्हणून कैरीचे पन्हे करून पितात .यामुळे उन्हाळ्यात त्रास खूपच कमी होतो व कैरीचा कीस फडक्यात घालून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची आग देखील कमी होते
…आंब्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहे .हे जीवनसत्व जंतुनाशक तर्क वितर्क त्वचा रोग कारक आहे. त्यामुळे आंबा उत्तम आरोग्य देणारा आहे .आंबा हा उष्ण असल्यामुळे त्याचे अतिसेवन त्रासदायक ठरते. तसेच कैरीचे अतिसेवन पोटाचे विकार वाढवते. आंब्याचे अनेक उत्पादने देखील बाजारात विक्रीला येतात.याला खूप मागणी असते.
आंबा हा तयार होण्यासाठी कमीत कमी 80 ते 90 दिवसांची गरज असते. त्याला फुलोरा अवस्था व फळं अवस्था या दोन्ही अवस्थेतून जाव लागते.आंबा लागवडीसाठी जमीन ही मध्यम व भारी प्रतीची असावी लागते .कमीत कमी 1.5 ते 2.5 पाण्याची मात्रा करणारी असा वी . आंब्याची लागवड ही कोया पासून किंवा कलम पासून तसेच व्हिनेगर कलम पासून सुद्धा केले जाते.
अशाप्रकारे हा बहुगुणी आंबा सर्वांनाच खूप आवडता आहे. आंब्यामध्ये विटामिन सी आणि विटामिन ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा आपल्या त्वचेला खूप चांगला फायदा होतो. आंबा हा उष्ण असल्यामुळे आंब्याचे अनेक उपयोग आहेत आंब्यामध्ये तंतू असतात जे पचन आणि हृदयविकार अशा तसेच अनेक आजारांवर देखील मदत करतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती चांगली करतात. आंब्याचा रस हा मधुर असल्यामुळे उन्हाळ्यात होणारी गर्मी व उष्णता थोडीफार का होईना कमी करतो. आंबा हा कर्करोगाच्या पेशी विरुद्ध लढण्यास मदत करतो. सर्व आंब्यापैकी माझा आवडता आंबा हापूस आंबा. हापूस आंबा हा आकाराने एकदम लहान असून तो दक्षिण भारतात पिकवला जातो हापूस आंब्याला बाजारांमध्ये व तसेच सर्वच देशांमध्ये खूप मागणी असते हापूस आंबा हा रंगाने वरून लालसर असणारा असतो. हापूस आंब्याची परदेशात निर्यात खूप मोठ्या प्रमाणावर होते.
आंब्याला उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मागणी असते .आंबा हा उन्हाळ्यातच उपलब्ध असला तरीही त्याची चव आपण बाराही महिने घेऊ शकतो. कारण आज आंब्याचे सर्वच प्रकारचे पेयं बाजारात उपलब्ध आहे. त्याची किंमत पण ही खूप कमी असते.त्यामुळे सर्वांना केव्हाही त्याचा आनंद घेता येतो. असा हा आंबा खूप गोड मधुर व गुणकारी आहे.
#आंबा माहिती मराठी