गुरु चे महत्व निबंध | Essay on Guru in Marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा

गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरु हा एक संस्कृत शब्द आहे संस्कृत मध्ये गुरु म्हणजे अक्षरशा: अंधार दूर करणारा. गुरूला आपल्या जीवनात ईश्वराचे स्थान दिले आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे गुरूचा हात असतो.

गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारी व्यक्ती.

पण सर्वात महत्वाचे म्हणजे आपली आई आपल्या जीवनात सर्वात पहिली गुरु आहे कारण गर्भसंस्कार पासूनच शिक्षणाची सुरुवात होते. आपले मूल एक आदर्श सुसंस्कृत व्यक्ती बनावे यासाठी आपले सर्वस्व पणाला लावते. त्यासाठी अविरत कष्ट करत असते आईच्या उच्चारणाने मुलांना भाषेचे ज्ञान गर्भातच होते.

मुल जन्मल्यानंतर आईने सांगितलेल्या गोष्टी दिलेली शिकवण अनुभव हे मुलांच्या जीवनावर चिरस्थायी प्रभाव सोडतात लहानपणी दिलेली शिकवण ही कायम लक्षात राहते. आई ला या पृथ्वीवर देवत्वाचे रूप प्रदान झालेले आहे. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य आई करते असते म्हणून आई प्रथम गुरुस्थानी आहे. आई ही पहिला गुरु आणि पहिली शाळा आहे. त्यानंतर शिक्षक आणि आध्यात्मिक गुरु.

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे एक उदाहरण द्यायचे तर ‘नदीत पाणी भरपूर आहे परंतु आपली मान खाली केल्याशिवाय आपल्याला पाणी मिळू शकत नाही’. त्याचप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होत नाही.

” गुरु बिना ज्ञान कहासे लावू”

जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचा आहे पण गुरु ही तेवढा योग्य असला पाहिजे जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक गोष्टीपासून, व्यक्ती पासून काही ना काही शिकत असतो. आणि म्हणून तर आपण जगण्यायोग्य बनत जातो आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्याला शिकवण देते ती आपली गुरुच असते.

उदाहरणार्थ:- सूर्य, पृथ्वी, वारा, अग्नी, जल, नद्या, झाडे, फुले, पाने, डोंगर, निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला बोध देत असते.

त्यानंतर नंबर येतो तू शाळेतील शिक्षकांचा. त्यांचीही खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते मुलांवर चांगले आणि योग्य संस्कार करण्याची. बाल मनाला पैलू पाडण्याचे काम हे प्राथमिक शाळा आणि नंतर हायस्कूल मध्ये होत असते. आई-वडील आणि प्राथमिक शाळेचे शिक्षक यांनी केलेले कोऱ्या पाटीवरील संस्कारही टिकून असतात. मग ते चांगलं असोत किंवा वाईट त्याचा प्रभाव त्या मुलाच्या पुढील आयुष्यात कायम राहतो.

पण दुर्दैवाने आज काल शाळेत चांगले शिक्षक आदर्श शिक्षक खूप कमी आढळतात शिक्षकांचे आचरण चांगले नसेल तर ती विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार? मुलांवर चांगले संस्कार करावयाचे असतील तर आधी शिक्षकाची जीवनपध्दती आदर्श असायला हवी. दारू पिणाऱ्या शिक्षक कुठला चांगला आदर्श विद्यार्थी पुढे ठेवणार. काही शाळांमध्ये तंबाखू खाणारे शिक्षक आहेत आणि ते विद्यार्थ्यांसमोर तंबाखू खातात पण एवढेच नाही तर तंबाखू पुडी आणायला विद्यार्थ्याला पाठवतात मग कसे कळेल आदर्श पिढी?

पूर्वीची गुरुकुल पद्धत खूप छान आणि आदर्श होती. मुलांना ऋषीमुनींकडे अरण्यात पाठवत मग ती गुरु त्यांना स्वावलंबनापासून तर सर्व प्रकारच्या कलगुनणां मध्ये पारंगत करीत असत. त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार करीत असत. स्वतःच्या आचरणाने त्यांच्यात चांगले गुण परोपकार,त्याग,शौर्य इतरांशी वागण्याची पद्धत मोठ्यांविषयी आदर, सर्वांसाठी प्रेमाची भावना इत्यादी रुजवत असत.पालक देखील त्या गुरूंच्या तब्यात आश्रमात सोडून निघून जात आणि त्या शिष्याला शिक्षा करण्याची मुभा गुरूला असे. आता तर शिक्षक शिक्षा ही करू शकत नाही केली तर पालकच जाब विचारायला येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवरही वचक राहिली नाही.

आदर्श आणि योग्य गुरु चे उदाहरण म्हणजे संत रामदास स्वामी :-

संत रामदास स्वामी कडे एक महिला तिच्या एका पाच सात वर्षाच्या मुलाला घेऊन गेली. ती स्वामींना म्हणाली,”महाराज, हा मुलगा खूप गोड खातो. त्याच्यावर काही उपाय करा. ” स्वामी रामदासांनी तिला आठ दहा दिवसांनी परत येण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती महिला आठ दिवसांनी पुन्हा आली त्या वेळी स्वामींनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला गुळ न खाण्याविषयी उपदेश केला. त्या महिलेने आश्चर्याने विचारले,”महाराज, हे तुम्ही गेल्या वेळी मी आली होती तेव्हा का नाही केलीत?

संत रामदास म्हणाले, “माते, मी स्वतः गूळ खात होतो मग मी त्याला गुळ खाण्याविषयी कसे सांगू शकणार होतो. आता मी गुळ खाणे सोडले आहे म्हणजे मला त्याबद्दल उपदेश करण्याचा अधिकार प्राप्त झाला.

असे होते पूर्वीची गुरु. म्हणून जीवनात योग्य गुरु आपणास लाभले तरी योग्य संस्कार होऊन आपण आदर्श जीवन जगू शकतो.

आपल्या जीवनात गुरू-शिष्याचे नाते पवित्र मानले जाते. गुरु शिष्याचा संबंध फक्त आध्यात्मिक स्वरुपाचे असतो.शिष्याला’माझा उध्दार व्हायला हवा’ हे एकच जाणीव असली पाहिजे आणि गुरूंना एकच जाणीव असते की, ‘याचा उध्दार व्हायला हवा’ गुरू-शिष्याचे नाते हे वयपरत्वे नसते ते नाते ज्ञानवृद्धी आणि साधनवृध्दी याच्यावरच आधारलेले असते.

गुरु हा एक सुंदर आरशाप्रमाणे असतो ज्यात शिष्य आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेतो. गुरु शिष्याचा मार्गदर्शक असतो. गुरु हा कुंभारा प्रमाणे असतो आपल्या हातानी शिष्याच्या जीवनाला मजबुती प्रदान

करतो.

असं तर आपल्या जीवनात अनेक अशी व्यक्ती येतात त्यांच्याकडून आपल्या ला ज्ञान मिळते. परंतु एका व्यक्तीमुळे आपले जीवन बदलते. जो आपल्या जीवनाचा सारथी बनतो. आपल्याला योग्य वळणावर नेतो एक मोठा व्यक्ती बनण्यास मदत करतो. अशा गुरुचे आपण नेहमी आभार मानायला हवेत.

म्हणून आपल्या भारतात आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या जीवनात आपण आतापर्यंत जे काही मिळवले त्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा आणि भविष्यात जे करायचे आहे त्याचा संकल्प सोडण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.

त्यादिवशी आपण आयुष्यात जे काही प्राप्त केले त्याची जाणीव करुन आपल्या गुरुचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा करतो. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते पोर्णिमा म्हणजे “प्रकाश” गुरु शिष्याला ज्ञान देतात ते ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची असते तो हा दिवस.

आपल्या जीवनात गुरूंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सद्गुरूंना आहे सर्व मानवजातीला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे भक्ताला गुरूला स्मरण्यासाठी गुरुपौर्णिमा मानले जाते.

“ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे। त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे।

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी।तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही।।”

आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सद भावाने सद्गुरु चरणाची सेवा करावी. जेथे गुरुचरित्र आहे तेथेच मोक्ष देणारी काशी पंढरपूर आहे हे ध्यानात घ्यावे सर्व तीर्थे येथे लोळण घेत असतात देवांचे देव सुद्धा तेथे वस्तीस असलेले असतात. गुरूंचा महिमा अपार आहे. तो ऋषीनाही वर्णन करता आला नाही. त्याची लीला आगाध आहे.

अशाप्रकारे आपण गुरु विषयी माहिती बघितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *