दसरा सणाची माहिती मराठी

भारतामध्ये वर्षभर खूप सण साजरे केले जातात. तसाच एक लोकप्रिय सण म्हणजे दसरा.दसरा का व कसा सुरु झाला यावर खूप काही गोष्टी प्रचलित आहेत.सर्वच लोक विजयादशमी ला पवित्र मानतात. देवी दुर्गेने युद्ध करून क्रूर राक्षसाला ज्यादिवशी संपवून विजय मिळवला , म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. व देवीला महिषासुरमर्दिनी असे म्हटले जाते आणि नवरात्री नंतर येणाऱ्या दहाव्या दिवसाला विजय मिळवल्या मुळे हा दिवस म्हणजे दसरा. दसरा हा सण आपल्या हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा दसऱ्याचा दिवस. अनेक शुभ मुहूर्त या दिवशी पार पाडले जातात. अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने ,शत्रूवर प्रराक्रमाने विजय प्राप्त करण्याचा दिवस म्हणजेच विजयादशमी. असे म्हणतात की आज सण मोठा नाही आणि विजयाला तोटा नाही. हा सण विजय निर्माण करणारच आहे.

या दसरा मागे फार मोठा इतिहास या विषयाच्या मागे दडलेला आहे. प्रभू रामंद्रांनी दृष्ट रावणाचा वध केला. आणि सीता मातेला रावणापासूनव वाचवले होते . म्हणून या दिवशी कित्येक रावणाचे पुतळे बनवून जाळले जातात. म्हणजेच अहंकाराचा नाश केला जातो. जर कधी अहंकार केला तर आपली स्थिती रावणासारखी होते.म्हणून रावणासारखे न जगता प्रभू राम सारखे जीवन जगा. हाच ऐक उद्देश आहे. रावणाचे पुतळे पाहण्यासाठी प्रचंड लोकांची गर्दी झालेली असते.

सर्वच लोक अनेक नवीन कामांची सुरवात याच दिवशी करतात. नवीन दुकाने, खरेदी तसेच नवीन वाहने देखील याच दिवशी घेतात. हा दिवस अतिशय शुभ असल्याने या दिवशी सोन घेण्याची प्रथा आहे. या दिवशी शस्त्रांची पूजा देखील केल्या जाते. व आपल्या कडील असलेल्या वाहनांची पूजा करतात.

दसऱ्याला लोक पहाटे उठून उटणे लावून आंघोळ करतात. दाराला झेंडूचे फुले तसेच आंब्याचे पानांचे तोरणे लावून सुशोभित करतात. दाराबाहेर मोठं मोठ्या रांगोळ्यांनी आंगन शोभून दिसतात. संध्याकाळी सर्वच त्या दिवशी नवनवीन कापड घालून तिन्ही सांजेला सोन लुटायला जातात. मोठ्यांना सोन म्हणून आपट्याची पाने देऊन त्याचा आशीर्वाद घेतो. या दिवशी सरस्वती पूजन, शस्त्रपूजन देखील केले जाते.लोक एकमेकांना भरभरून शुभेच्छा देतात. आपला आनंद व्यक्त करतात.

एकमेकां मधले परस्परं मधले प्रेम व्यक्त करण्याचा सण म्हणजे दसरा. वर्षातला हाच एक असा सण आहे की आपण आवर्जून लोकांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतो. त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. यांचे आशीर्वाद घेतो. सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा दसरा हा दिवस. सोशल मीडियाच्या द्वारे आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. कान विषयी प्रेम आदर व्यक्त करतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. कोणी साधुसंतानी असे असे म्हटले आहे की, ” साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा,”असा हा दसऱ्याचा सण सर्वांमध्ये उत्साह, चैतन्य, प्रेम,आपुलकी ,जिव्हाळा निर्माण करणारा आहे. व जपणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *