दिवाळी सणाची माहिती

दिवाळी या सणाला हिंदू धर्मातच नाही तर इतर धर्मातही खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळी हा दिव्यांचा प्रकाशाचा सण . हा सण भारत नेपाळ सिंगापूर, मलेशिया श्रीलंका ,इंडोनेशिया सूरीनाम, दक्षिण आफ्रिका सर्वच देशांमध्ये उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीला लोक एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना फराळ शुभेच्छा देतात. या सणाची लोक आतुरतेने वाट वर्षभर बघत असतात. दिवाळीच्या या सणाला आपण आपली दुःखे विसरून जातो व आनंदात फटाके फोडतो. या फटक्या प्रमाणेच आपले दुःख देखील उडून जाते. घरातील व घराबाहेरील सर्व साफ सफाई करतो. घराला रंग रांगोटी करतो. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते.घरातील नकारात्मक विचार संपतात. चांगल्या विचारांना घरात चालना मिळते. त्यामुळेच घरात लक्ष्मी माता नांदते. आपण घरात व घराबाहेर तेलाचे लहान लहान दिवे लावतात. सर्वच ठिकाणी दिव्यांनी उजळून निघणारा दिवाळी हा सण. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवाळी हा सण.

तसेच प्रत्येकाचे जीवन हे अंधारातून प्रकाशाकडे यायला हवे, हाच या मागचा उद्देश असतो. तसेच घराबाहेर लायटिंग, आकाश कंदील लावतो. तसेच घराबाहेर आंगणात मोठी सुशोभित रांगोळी काढली जाते. पावसाळा संपून नवीन पिके येतात तेव्हा शरद ऋतूचे मध्यभागी आश्‍विन व कार्तिक या महिन्याच्या संधिकाळात हा सण येतो. अश्‍विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाची असतात. हा सण ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर दरम्यान येतो या सणाला भारतात सर्व ठिकाणी सुट्टी राहते. सर्व शाळा कॉलेज, महाविद्यालये, ऑफिस याना सुट्टी राहते.

असे म्हणतात की 14 वर्षाचा वनवास पूर्ण केल्यानंतर रामचंद्र अयोध्येला परत आला तो याच दिवशी पण त्यावेळी त्याचे सर्व खूप भिन्न होते .प्राचीन काळी याचा उत्सव मानला जाई. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिवा, हा मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर करून हा दीपोत्सव साजरा केला जातो. या सणाला घराबाहेर पाचदिवस दिवे लावले जातात रांगोळी काढली जाते .सकाळी पहाटेच उठून उटणे लाऊन आंघोळ केली जाते. व गल्लीतून काकडा आरती काढल्या जाते. इतर ठिकाणी तर मातीची खेळणी तयार करतात धान्य पेरतात यामागे परंपरा ते जगतात.

दिवाळी हा सण पाच दिवसांचा असतो पहिल्या दिवशी वसुबारस असते. तर दुसरे दिवशी धनत्रयोदशी तिसऱ्या दिवशी नरक चतुर्थी व चौथ्या दिवशी गोवर्धन पूजा व पाचव्या दिवशी भाऊबीज असा पाच दिवसात हा सण विभागला जातो.

वसुबारस:- वसुबारस ला द्वादशी असेही म्हणतात आता गोवत्स द्वादशी म्हणजे काय , तर वसुबारस म्हणजे अर्थ वसू म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी .या दिवसाचे महत्त्व असे आहे की त्या दिवशी संध्याकाळी घ गाईची पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी धेनु ची पूजा केली जाते .ज्यांच्याकडे घरी गाई , वासरे आहेत . त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. व घरातील सर्व बायका गाईच्या पायावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून त्यांना ओवाळतात. गाईची परंपरेनुसार पूजा केली जाते. गाईंना ओवाळून केळीच्या पानावर त्यांना नैवेद्य देतात. या दिवशी काही लोक तर गहू मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. व आपल्या हिंदू धर्मात गाईला देवाचे स्थान दिले आहे. गायला आपण गोमाता म्हणून पुजतो.

धनत्रयोदशी:- आश्विन शुद्ध त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो .धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे पुरातन काळी अनेक काही कथा आहेत त्या परंपरेनुसार धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी सुद्धा आपल्या घराच्या व घराच्या जवळ दिवे लावले जातात. दिव्याच्या लखलखता मुळे एक नवीन चैतन्य निर्माण होते .धनत्रयोदशी बद्दल अजून एक अशी कथा प्रसिद्ध आहे की, जेव्हा इंद्रदेव आपल्या महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते

धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कुंडल पाणी भरलेला आहे. धनतेरस ला कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर कोणतीही व्याधि होण्याचा संभव राहत नाही .आपले शरीर हे निरोगी राहते.कडुलिंबाची एवढेच महत्त्व असल्यामुळे या दिवशी धन्वंतरीचा प्रसाद म्हणून कडुनिंबाची पाने देण्यात येतो या दिवशी धनाची पूजा केली जाते.

नरक चतुर्दशी:- कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात .दिवाळीच्या हा एक हा एक सण आहे या सणाशी संबंधित एक आख्यायिका अशी आहे की नरकासूर नावाच्या एका राक्षसाने तप करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण सोळा हजार 100 स्त्रियांना पळवून नेले. मनी पर्वतावर एक नगर बसून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले त्याने पुढे त्याने देवमाता व वरुणाचे विशाल छत्रे बळकावले त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता . कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी पहाटेच उठून लावून आंघोळ करतात व आपल्या मधील अलक्ष्मीचा व अहंकाराचा नाश केला जातो. नरकासुराचा वध या प्रित्यर्थ साजरा करणाऱ्या या सणाला या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्र दाने केले जाते.

लक्ष्मीपूजन:- लक्ष्मीपूजन येणारा हा सण या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते .सर्वच नवीन कपडे घालून तयार होतात. घरात लक्ष्मीची पूजा मांडली जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते. लक्ष्मी ही ज्याच्या घरी स्वच्छता , मनाने निर्मळ , स्वाभिमानी , असणाऱ्या लोकांच्या घरी वास करते. या दिवशी लोक आपल्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू करतात. या दिवशी पहाटेच अभ्यंगस्नान करतात पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात ,त्यात सोन्याचे दागिने चांदीचा रूपया दागिने ठेवून त्यांची पूजा केली जाते. व्यापारी लोक उत्साहाने साजरा करतात . दाराला तोरण लावली जातात. चीन काळात कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जात होता. या दिवशी संध्याकाळी घरात घराबाहेर व सर्व अंगणात तसेच दिवाळी या सणाला लाइटिंग , घर सुशोभित केली जातात. फराळाचा आनंद घेतला जातो.

गोवर्धन पूजा:- बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा असे म्हणतात मथुरे कडील काही लोक गोवर्धन पर्वताची पूजा करतात. प्रत्येक घरात गोवर्धन काढून त्याची पूजा केली जाते. गोवर्धन गाईच्या गोबर चा बनवला जातो. व त्याच्या साईडने गोवर्धन ला पूर्ण सुशोभित करण्यात येते त्याच्यावर सर्व महिला हळद कुंकू लावून व नैवेद्य दाखवून त्याची पूजा करतात. या गोवर्धन पूजेला दिवाळीत खूप महत्त्व दिले गेले आहे.हा गोवर्धन १२ दिवस घरी ठेवतात.

भाऊबीज :_ भाऊबीज हा दिवाळीचा पाचवा दिवस. या दिवशी प्रत्येक बहीण सर्वात आधी ही चंद्राला आणि नंतर आपल्या भावाला ओवाळते. आरती करते. प्रत्येक बहीण ही आपल्या भावाच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. व भाऊ त्यांना सुंदर असे गिफ्ट देतात.हा सण सर्वच ठिकाणी साजरा केला जातो. रक्षाबंधन नंतर येणारा भाऊ बहिणीचा सण म्हणजेच भाऊबीज.लग्न झालेल्या मुलींना भाऊबीज ला त्यांचा भाऊ माहेरी घेऊन घेतो. भावा बहीनचा प्रेम, माया ,आपुलकी, जपणारा हा सण.भाऊ हा बहिणीला कोणत्याही संकटापासून वाचवण्याचे वचन देतो.आपल्या हिंदू धर्मात याला खूप महत्त्व आहे. अस म्हणतात की , आली “आली दिवाळी, बहीण भावाला ओवाळी”

अशाप्रकारे दिवाळी ही आनंदात उत्साहात प्रकाशाच्या लखलखंटात, दिव्याच्या सुंदर प्रकाश, तसेच फटाक्यांचा आवाज, मिठाई, फराळ , नवीन कपडे, अशा सर्वच गोष्टीमुळे आनंदायी बनते.या दिवाळीची सर्वच आतुरतेने वाट पाहत असतात.सर्वच लोक दिवाळी ही आपल्या कुटुंबासोबत आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत साजरी करतात. या सणाच्या निमित्ताने सर्वांना आपल्या लोकांसाठी वेळ मिळतो. सर्व एकत्र येतात. एकत्र येऊन फराळाची फटाक्याची मजा घेतात.म्हणून वर्षातला सर्वात मोठा सण हा दिवाळी असतो.दिवाळी ला माहेरी यायला मिळत असल्याने त्याचा उत्साह तर हा वेगळाच असतो.लहान मुलांचा तर खूप आवडता सण. अशी ही दिवाळी प्रत्येकाच्या जीवनात प्रेम, सद्भावना, आपुलकी, जिव्हाळा निर्माण करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *