नवरात्री मराठी माहिती

हा प्राचीन काळापासून चालत आलेला एक पारंपारिक सण आहे. नवरात्रीला दुर्गापूजा देखील म्हणतात. शास्त्रानुसार राक्षस राजा महिषासुराणी उत्सुकतेने भगवान शिवची पूजा केली ,आणि त्याला खूप शक्ती मिळाली . लोकांवर खूप अत्याचार करत राहिला .ब्रम्हा, विष्णु आणि शिव यांची शक्ती एकत्र करून महिषासुराणपासून रक्षण करण्याकरता देवी दुर्गा मातेची निर्मिती झाली.अशी आख्यायिका आहे. पावसाळा संपत व तसेच थंडीची चाहूल लागणारा अश्विन महिना. त्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीची नऊ रूपांची पूजा केली जाते. सर्वच लोक देवीची पूजा अर्चना करतात. महिलांचा उत्साह या दिवसात पाहायला मिळतो. सर्व मंडळी नऊ दिवस भजन-कीर्तन करतात. तसेच नवरात्रामध्ये नव्या दिवशी कुमारिकांना भोजन देतात . या कुमारिका देवी स्वरूपात मांडल्या जातात. या भोजनात खीर आणि चण्याचा प्रसाद केला जातो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रथा , परंपरा , सण अतिशय भक्तिभावाने साजरे करत असतो .नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र , भक्तिभवाचा सण मानला जातो. नवरात्र उत्सव देवी दुर्गे ला समर्पित असा उत्सव आहे .नवरात्री या शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो.

भारतात आणि इतर देशांमध्ये पण हा नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा केला जातो. तसं बघितलं तर पाच प्रकारचे नवरात्र येतात . त्यापैकी शारदीय नवरात्र हा सर्वात प्रसिद्ध नवरात्र आहे. नवरात्रात नवरात्राचे उपवास करावे लागतात. नवरात्री आणि दहाव्या दिवशी देवीची पूजा ,अर्चना केली जाते .व दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा असल्याने या दिवसाला साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो .नवरात्राची एक अशी कथा प्रचलित आहे प्रभू रामचंद्रांनी देवी दुर्गे ला रावणाचा युद्ध होताना असताना बोलावले होते वसंत ऋतूच्या शेवटी दुर्गा देवीची पूजा अर्चना केली जाते युद्धाची शक्यता पाहता प्रभू रामचंद्र देवीला आमंत्रित केले होते. त्यावर नवरात्र उत्सव ला प्रारंभ झाला.

नवरात्राच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये माता दुर्गेची पूजा केली जाते . आपण आई दुर्गा देवीला ऊर्जा, शक्तीची देवता ,मानतो. नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते परंतु तीन दिवस त्यांच्या पार्वती कुमारी आणि काली स्वरूपाची पूजन करण्यात येतं. नवरात्रात खूप.लोक देवीच्या दर्शनासाठी जातात.गावात अनेक ठिकाणीं देवीची मंडळ स्थापन केली जातात. वर्गणी गोळा करून देवीची छान अशी मूर्ती स्थापित करण्यात येते. या देवीला रोज नवनवीन रंगाची साडी घातल्या जाते. सर्वच शृंगार तिला घालण्यात येतो.देवीचे असे तेज रूप पाहून डोळे लखलखतात. अनेक उत्सव, कार्यक्रम या ठिकाणी होतात.

जसा गणपती उत्सव हा प्रत्येक घराघरांमध्ये साजरा केला जातो .तसा देवीची स्थापना प्रत्येक घरामध्ये केली जात नाही. जर आपल्या घरात परंपरेनुसार घट मांडण्याची प्रथा असेल तरच आपण घट मांडू शकतो. घट हे कामठी च्या बनवलेल्या मध्ये माती भरले जाते व त्याच्यामध्ये धान्य पेरले जाते व या टोपीला दहा दिवस पाणी टाकले जाते व दहाव्या दिवशी दहा दिवस पूर्ण झाल्यावर टोपली धनाने हिरवीगार झालेली असते . या मातीमध्ये घट्ट झाकून ठेवलेला असतो. टोपलीच्या मातीचा घट ठेवून त्यात विड्याची पाच पाणी ठेवले जातात. व त्यावर नारळ ठेवला जातो.

प्रत्येक दिवशी या घटावर वेगळे फुलाची माळ सोडली जाते , तर कुठे विड्याची पाने ठेवण्यात येतात तसेच या घटावर फुलोरा देखील बांधला जातो व सकाळ संध्याकाळ या घटाची पूजा केली जाते आणि धूप पेटवला जातो देवीच्या घटाजवळ दिवा हा अखंड लावण्यात येतो . व तो दिवा विझू देण्यात येत नाही. प्रत्येकाच्या घरी सकाळ संध्याकाळ देवीच्या आरत्या करून , धूप दीप पेटविला जातो.

अष्टमीला होम हवन करून देवीला नैवेद्य दाखवण्यात येतो व यास नवमीला नवरात्रीचा कुळाचार असतो. नऊ दिवस देवीला हिरव्या रंगाच्या साड्या नेसल्या जातात आणि त्या रंगाप्रमाणे स्त्रिया देखील त्याच रंगाच्या साड्या परिधान करताना दिसतात. स्त्रियांचे अनेक कार्यक्रम या नवरात्रात होत असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एक तेज असते. एक उत्साह असतो. व तसेच स्त्रिया देवीची ओटी भरतात आपले सौभाग्य कायमचे राहू दे अशी देवीपुढे प्रार्थना करतात.

नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा आनंदाचा दिवस असतो. देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. सकारात्मक विचार येतात. त्यामुळे घरातील वाद, भांडणे कमी होतात. दिवशी कुमारिकांचे पूजन केले जाते कुमारिकांना बोलावून त्याची पूजा करून त्या कुमारिकांना भोजन देऊन त्यांना एक भेटवस्तू दिली दिली जाते. नऊ कुमारिका ह्या देवी दुर्गेचे रूप असल्याने त्यांची पूजा करण्यात येते या दिवशीच करण्याचे पाद्यपूजन देखील केले जाते त्यांना मोठ्या आदराने आणि सन्मानाने बोलून त्यांना पाटावर बसवून गोड जेवण देतात.

खूप ठिकाणी कुटुंबामध्ये जोगवा मागण्याची देखील परंपरा आहे . त्याप्रमाणे घरातील सवाष्ण स्त्री पाच घरी जाऊन जोगवा मागते त्यामध्ये गुळ , तांदूळ ,गहू असे काही असते. सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. सुरेख असे देखावे तयार करण्यात येतात .पारंपरिक आणि पुरातन काळातील देखावे आकर्षक असतात. आपले लक्ष वेधून घेणारे असे सुंदर देखावे तयार केले जातात.

कोल्हापूर तुळजापूर माहूर सप्तशृंगी शक्तिपीठांपैकी दहा दिवसांमध्ये या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी असते भावीक या दिवसांमध्ये देवीचे दर्शन घेऊन मोठे पुण्याचे समजतात.. नवरात्र मध्ये दांडिया गरबा खेळतात विशेषता गुजरात मध्ये याला खूप प्रसिद्ध आहे.

देवी दुर्गेच्या सन्मानार्थ हा गरबा खेळला जातो दांडिया हा आजच्या नंतर खेळला जातो. असा हा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *