माझा आवडता खेळ खो खो निबंध | खो खो खेळाची माहिती मराठी निबंध

माझा आवडता खेळ खो खो निबंध | खो खो खेळाची माहिती मराठी निबंध

माझा आवडता खेळ खो खो निबंध
माझा आवडता खेळ खो खो निबंध
(Image credits: kreedon)

माझा आवडता खेळ खो खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. मानवी जीवनामध्ये खेळायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आपण ते जाणतोच. खेळाने शरीर सुदृढ बनते. जीवनामध्ये व्यक्तिमत्व निर्माण होण्यास, समयसूचकता, निर्णय क्षमता विचार क्षमता ,कार्यक्षमता बुद्धिचातुर्य धैर्य, साहस व इत्यादी सर्वच गोष्टींची आवश्यकता असते व आपल्याला या सर्व गोष्टी खेळामुळे मिळतात. खेळामुळे आपल्याला हे गुण वाढीस लागतात. त्यामुळे खेळाचे आणि आपल्या जीवनाचे किती महत्त्व आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यातला माझा आवडता खेळ खो खो आहे. भारतात सर्वच ठिकाणी खो खो हा खेळ प्रसिद्ध आहे. हा खेळ खेळायला शारीरिक बल लागते. हा खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते. कोणत्याही प्रकारची बिमारी लवकर होत नाही.

मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडले तर या खेळाला कोणत्याच साहित्याची आवश्यकता नसते. हा खेळ खेळायला अतिशय सोपा आहे. आणि लोकप्रिय देखील आहे. हा खेळ खेळायला चपळता, गती लागते. खो खो हा खेळ पाठशिवणी या प्रकारातला आहे. या खेळात दोन संघ खेळतात. व दोन्ही संघात प्रत्येकी १२ खेळाडू असतात. मैदानात प्रत्येक संघाचे ९ खेळाडू उतरतात.

आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात त्यामध्ये खो-खो ,कबड्डी बॅडमिंटन क्रिकेट ,हॉकी असे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात त्यापैकीच खो–खो हा एक माझा आवडतं खेळ.

खो खो खेळाचा उगम नेमका कुठे झाला हे सध्या तरी माहिती नाही. पण खो खो चा उगम नक्की महाराष्ट्र झाला असे वाटते. पकडापकडीच्या खेळातून या खेळाचा उगम झालं असावा. पारंपरिक पद्धतीने खेळला जाणारा हा खेळ प्रसिद्ध आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खोखो या खेळांमध्ये नियमांची सुरुवात झाली 1914 साली पुणे येथील जिमखाना येथे खो-खो चे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली 1959 व 60 मध्ये आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे खो खो ची पहिलीच स्पर्धा घेण्यात आली. या सामन्यातील खेळाडूंना पुरस्कार देखील देण्यात आले.

शाळेत लहान असताना सर्वांनीच हा खेळ खेळला आहे. माझ्या शाळेत पण हा खेळ खेळला जायचा. या खेळाला साहित्याची खूप कमी गरज असल्याने हा कुठ पण खेळाला जाऊ शकतो.

खो-खो हा एक सांघिक खेळ आहे. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. दोन्ही संघ ही विरुद्ध खेळतात. खो-खो हा खेळ खेळण्यासाठी चाळीस मिनिटे दिले जातात आणि तो 20 -20 मिनिटे अशा दोन भागात हा खेळ विभागला जातो. दोन भागांच्या मधात पाच मिनिटाचा विश्रांतीचा वेळ असतो. खो-खो चे मैदान हे आयताकृती असते या मैदानाचा आकार 27 बाय 16 मीटर असतो. तसेच मैदानाच्या टोकाला दोन लाकडी खांब असतात. आणि या दोन्ही खांबांना जोडून अशी रेष असते त्या रेषेची लांबी तीस मीटर असते.

खो – खो या खेळाची संकल्पनाच पाठलाग करणे आणि बचाव करणे अशी असते. खेळामध्ये दोन भाग असतात. आणि दोन भागाचे उपभाग असतात. पहिल्या भागामध्ये पहिला संघ हा पाठलाग करतो, तर दुसरा संघ बचाव करतो. आणि दुसरे संघामध्ये पहिला संघ बचाव करतो व दुसरा संघ पाठलाग करतो. मैदानामध्ये पाठलाग करणाऱ्या संघांमध्ये पूर्ण नऊ खेळाडू असतात. ८ पाठलाग करणारे खेळाडू असतात व तीन बचाव करणारे खेळाडू असतात. या खेळामध्ये प्रत्येक खेळाडू हा प्रत्येकाच्या विरुद्ध दिशेला बसलेला असतो. यातील एक खेळाडू हा खेळाडूंचा पाठलाग करण्यासाठी खांबाजवळ उभा असतो .

खो – खो खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणारा खेळाडू हा बसलेल्या खेळाडूंचा पाठलाग करू लागतो. पाठलाग करणारा संघ खेळाडुंना बाद करण्याचा प्रयत्न करतो, पाटला करणारा खेळाडू खाली बसलेल्या खाली बसलेल्या खेळाडूला खो घालून तो त्याच्या जागे बसतो तो दुसरा खेळाडू बचाव संघातील खेळाडूचा झपाट्याने पाठलाग करू लागतो. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो.

आजकाल मैदानी खेळ खूप कमी पाहायला मिळतात. सर्वच मुले ऑनाइन गेम मध्ये खूप गुंतले आहेत.त्यामुळे मुलांना हे खेळ खेळायला प्रोत्साहन केले पाहिजे. या खेळाचे अनेक फायदे देखील आहेत. या खेळामुळे शरीर तंदुरुस्त सुदृढ बनते. बुध्दी ला चालना मिळते. तसेच शरीरावरील मेदाचे प्रमाण देखील की होते.

Thank you for reading माझा आवडता खेळ खो खो निबंध!

Also read:

माझा आवडता कलावंत मराठी निबंध

मराठी महिने, नावे व दिवस

1 thought on “माझा आवडता खेळ खो खो निबंध | खो खो खेळाची माहिती मराठी निबंध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *