माझा वर्ग निबंध मराठी

मला खरच माझ्या क्लास बद्दल खूप अभिमान वाटतो. वर्गात एकूण ४५ विद्यार्थी. आमचा वर्ग म्हणजे कला, क्रीडा, नृत्य, मस्ती ,संगीत असा सर्वच गोष्टीमध्ये पुढे. वर्गात गणिताचे सूत्र, प्रमेय, हे याचे मोठे चार्ट करून लावले होते. तसेच विज्ञानाचे प्रयोग, सूत्र चे पण चार्ट लावले होते त्यामुळे मुलांच्या लक्षात आजपर्यंत आहे. आमचा वर्ग हा स्वच्छ, निर्मळ होता. मुलांचं अभ्यासात मन लागेल अशा ठिकाणी होता. वर्गात हवा ही नेहमी खेळती रहायची. आमचे वर्गशिक्षक आम्हाला खूप मन लावून जीव लावून शिकवायचे. आणि १० वर्ग हा खूप महत्त्वाचा असल्याने प्रत्येक शिक्षकाच सर्वच मुलांवर बारीक लक्ष होत. वर्ग १० वा माझ्या आठवणी मधला ला वर्ग आहे.

पहिल्या बाकाजवळून पहिल की सर्वच आपल्या कामात व्यस्त असायचे, अभ्यासाच्या नाही तर दंगामस्ती च्या कामात व्यस्त असायचे. माझा दहावीचा वर्ग ऑफिस च्या खूप लांब. म्हणजे आम्हीं किती पण मस्ती केली तरी ऑफिस मध्ये आवाज नाही जायचा. वर्गात सर्वांची ऐकी होती. सर्व मिळून राहायचे. टिफीन आम्ही सर्व सोबत खायचो.

वर्गातले सर्वच मुलं मुली एका बेंच वरून दुसऱ्या बेंचवर फुलपाखरा सारखे भटकायचे. एका ठिकाणी एका बेंच वर तर कोणी बसले नाही. खरच अजुन न पण ते सर्व आठवलं की खूप हसायला येत. वर्गातील प्रत्येक क्षणाचा स्पष्टीकरण केलं तर खरच वेळ पुरत नाही. त्यातले सर्वच खोडकर, मस्ती करणारे, बेंच वादक, काही हास्यसम्राट आहेत.

मधल्या सुट्टीचा वेळ म्हणजे कोणी मस्ती, कोणी कागदाचे बोळे करून एकमेकांना मारायचं तर कोणी कागदाचे विमान करून वर्गात उडवायचे, तर कोणी आपल्याच तालात राहायचे. परीक्षा आली की सर्वांसाठी मोठीच स्पर्धा असते. प्रत्येकासाठी एक एक गुण हा महत्वाचा असायचा. सर्वच विद्यार्थी मन लावून अभ्यास करायचे. स्पर्धा चालायच्या एकमेकांमध्ये. पण सर्वच एकजुटीने, एकाग्रतेने अभ्यास करून पुढे गेले.

दहावी वर्ग म्हणजे सर्वांचाच करियरचा टर्निंग पॉईंट असे म्हटले जाते. हा वर्ग म्हणजे आपल्या आयुष्याला पुढे लागणाऱ्या वळणाचा एक भक्कम पाया. घरातील सर्वच अभ्यास कर, अभ्यास कर असे म्हणून अभ्यास करण्यासाठी तगादा लावतात. या वर्गात अभ्यास हा जिद्दीने, चिकाटीने, करावा लागतो, तेव्हाच यश प्राप्त होते. दहावी झाल्यावर ऐक नवीन रस्ता मिळतो. एक नवीन ध्येय मिळत…. तो हा वर्ग संपल्यावर…

त्यात मी अन् माझे मित्र अभ्यास करण्यात खूपच मागे. आणि मस्ती करण्यात समोर. पण आम्ही नंतर सर्व सोबत अभ्यास करायचो. आमची अभ्यास करण्याची हिम्मत, जिद्द वाढली होती. एकमेकांना सर्व पॉईंट समजून सांगायचो. पण त्या वर्गान आम्हाला आपलेपणा दिलं… खूप जीव लावणारी मित्र दिली. सर्वच बोर्डाची परीक्षा चांगल्या मार्कने पास झालेत. सर्वांना छान टक्के मिळाले. पण आज ते मित्र सोबत नाहीत, त्या आठवणी सोबत आहेत सर्वांनी आपापलेले ध्येय निश्चित केली. सर्वांच्याच दिशा वेगळ्या झाल्या, सर्व मित्र विखुरले गेले, एक दोन मित्र आहेत फक्त सोबत, पण तो वर्ग ते मित्र, सर्व येईल का परत……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *