भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आपण सर्व शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणून संबोधतो. आज त्यांच्या मुळेच आपण आहोत. या काळया मातीत पीक उगवून ते सर्वांची अन्नाची गरज पूर्ण करतात.त्यांच्यामुळेच आज पूर्ण देश चालतोय. आज एवढी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये शेतक-यांकडे शेतकऱ्याच्या प्रश्नांवर कोणीच लक्ष देत नाही. शेतकऱ्यांनी शेती करणे आणि पिकवणे जर थांबविले तर आपल्याला धान्य कसे मिळणार.
जेव्हा आपण जय जवान जय किसान हा नारा एकतो त्यावेळेस आपल्याला लाल बहादूर शास्त्री यांच्या आठवण येते शेतकरी कुटुंबात जन्मलेले व पंतप्रधान होईपर्यंत शेतकरीच राहले. शेतकरी आपला अन्नदाता आहे, जर शेतकऱ्याने शेतातून पीक काढले नाही , परिश्रम केले नाही तर आपले पोट भरण्याची कल्पना पण करू शकत नाही. आपल्या सर्वांसमोर उपासमारीची वेळ येईल. अशीच माझी शेतकऱ्याची आत्मकथा तुम्हाला सांगतोय.
मी एक सर्वसाधारण भारतीय शेतकरी आहे. माझा जन्म साधारण कुटुंबात झाला. बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद या गावी राहतो. माझे नाव नवनाथ आहे .बाबा मी लहान असताना वारले, आई ने कसं तरी काबाडकष्ट लाहणाच मोठं केलं . आम्ही दोघं भावंड . मी सर्वात मोठा असल्याने माझ्यावर घराची पूर्ण जबाबदारी आली. गरीब असल्यामुळे मला माझे शिक्षण पूर्ण करता नाही आले. त्यामुळे शहरात जाऊन नोकरी करण्याचा मार्ग नव्हता. त्यामुळे शेती करणे हाच माझा व्यवसाय.
मी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत माझ्या शेतात काम करतो. ऊन असो वारा असो किंवा पाऊस असो या सर्वांना झुगारून मी माझ्या शेतामध्ये पीक काढतो. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी माझ्याकडे एकच एक साधन म्हणजे शेती आहे. मी माझ्या शेतात खूप कष्ट करतो परंतु एवढे कष्ट करून देखील सरकार आमच्या पिकाला योग्य भाव देत नाही . तेव्हा त्या होणाऱ्या वेदना असह्य असतात. आम्ही कधीच कोणाकडे हात पसरत नाही स्वतःच्या स्वाभिमानाने जगतो. गरीब आहोत पण आम्हाला आत्मसन्मान आहे.
आमचे पिकाला योग्य भाव नाही मिळाला तरीही आम्ही पुढच्या वेळेस तेवढ्याच जोमाने व तेवढ्यात हीमंतने परत आमच्या कार्याला सुरुवात करतो. का तर या वेळेस आमचे पिकाला हा चांगला भाव मिळेल आणि आमचे पिके चांगली येतील. त्यामुळे मागील पिकातील नुकसानीचा काही भाग हा बाहेर पडेल आणि माझ्यावरील कर्जाची रक्कम थोडीशी कमी होईल. प्रत्येक वेळेस एक नवीन आशा घेऊन आम्ही जगतो.
मला दोन मुली आहेत. एक मुलगा आहे. मला त्यांचा सांभाळ हा चांगल्या रीतीने करायचा आहे. मला त्यांना चांगले शिकवायचे आहे.त्यांना खूप चांगले उच्चशिक्षित करायचे आहे. त्यांना माझ्या सारखे शेतात काम करायला नाही ठेवायचे आहे .मुलीचे लग्न करायचे आहे. प्रत्येक आई बाबा चे असे स्वप्न असते की त्यांचा मुलीचा विवाह हा चांगल्या थाटामाटात व्हायला हवा. तशी माझी पण इच्छा आहे.
माझ्या पण काही अपेक्षा आहेत आशा आहे आणि मन देखील आहे माझी पण अशी इच्छा असते की ,माझ्या शेतातील पीके नेहमी डोलत रहावे पीक नेहमी चांगले यावे .सरकारने माझ्या पिकाला बाजारपेठेत चांगल्या रीतीने भाव मिळावा. कुटुंबामध्ये पैसे आणि अन्नधान्य असले पाहिजे कारण हीच आमची रोजची भाकर आहे.माझ्याकडे शेती हा पर्याय असून आमच्याकडे उदरनिर्वाहासाठी असा दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे आम्ही शेतकरी म्हणून सरकारकडून अशी अपेक्षा ठेवतो की आम्हाला त्यांच्याकडून खते, बीज, कितानाशके, व शेतीसाठी लागणारे पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.
सरकारने आमच्या पिकाला योग्य भाव देऊन मध्यस्थांना वाचवावे .जेणेकरून शेतकऱ्यांचे शोषण होणार नाही कालव्यांचे व नद्यांचे पाणी सिंचनासाठी वापरायाला द्यायला पाहिजे. आमच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी सरकारने उच्च प्रतीची शाळा बांधली पाहिजे.जेणेकरुन आपली मुले आपल्यासारख्याच शेतीवर अवलंबून न राहता लिखाण करून साक्षर होऊ शकतात.
आम्ही शेतकरी दिवस-रात्र शेतामध्ये काम करतो आमच्या पिकांचे देखभाल करतो . त्यांचे संरक्षण करतो. परंतु कचऱ्याच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान होते. कधी कधी तर पाणी नाही आले तर कोरडा दुष्काळ पडतो. व जास्त पाणी.आले तर ओला दुष्काळ पडतो. या समस्येमुळे आमची सर्व मेहनत वाया जाते. मिळालेल्या कर्जात शेती केल्यामुळे व त्याचे पीक न आल्यामुळे कर्ज फेडल्या जात.नाही. त्यामुळे कर्ज वाढतच राहते व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी हेच एक कारण प्रवृत्त करते.
शेतकरी आत्महत्यांवर कोणीही लक्ष देत नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या किती केल्या , का केल्या याची काळजी कोनी घेत नाही.मला अस वाटते की सरकारने आमच्या कडे लक्ष द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना करायला पाहिजेत देशातील बँकेच्या ह्या उद्योगपतींना व्यवसायिकांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज देतात व ही लोक कर्ज. न फेडता परदेशामध्ये पळून जातात. जर आम्ही आमच्या शेतीमध्ये पिकस घेतली नाही तर लोकांना खायला कुठून मिळणार अन्नधान्य कसे मिळणार. पण तरी आम्ही शेतकरी शेती करणे सोडत नाही. जेवढे कष्ट आमच्याने केले जातील मातीत तेवढे करू.लोकांची अन्नाची गरज पूर्ण करू. शेवटी आमच्या शेतकऱ्याचा एकच नारा ” जय जवान, जय किसान”