होळी सणाची माहिती मराठीत | होळी निबंध मराठी

होळी सणाची माहिती मराठीत | होळी निबंध मराठी
होळी सणाची माहिती मराठीत | होळी निबंध मराठी

होळी सणाची माहिती | होळी निबंध मराठी

भारतात होळीला खूप महत्त्व दिले गेले आहे. भारतात येणारे सर्वच सण खूप मजा देऊन जातात. या वर्षभरात येणाऱ्या सणांमुळे आपली प्रथा, संस्कृती, परंपरा जपून ठेवली जाते. भारतात होळीचा सण हा उत्साहात साजरा करण्यात येतो. हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येतो. थंडीची तीव्रता थोडी कमी होऊन उन्हाची थोडी फार चाहूल लागायला लागते. सर्वच सण साजऱ्या करण्या मागे काही ना काही तथ्य आहे. होळी साजरी करण्या मागे अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. पूर्ण देशात ही होळी परंपरेत पार पडल्या जाते.

चला तर होळी सणाची माहिती वाचुया.

आपल्या भारतात अनेक जाती धर्माचे लोक रहातात. त्यामुळे सर्वच सण एकत्रितपणे उत्साहात साजरे केले जातात. त्यातला होळी हा एक असा सण आहे कि सर्वच जण खूप आनंदात उत्साहात साजरा करतात. आपल्या हिंदू धर्मा मध्ये होळी सणाला विशेष प्राधान्य आहे. आपल्या हिंदू धर्मात व इतर धर्मात देखील हा सण साजरा केला जातो. तसेच नेपाळ राज्यात देखील हा सण साजरा होतो.

होळी ला होळी पौर्णिमा किंवा रंगाचा सण असे देखील म्हणतात. सर्वच एकत्र येऊन हा सण साजरा करतात. लहान मुलांपासून तर मोठ्या पर्यंत हा सण सर्वांनाच खूप आवडतो. होळीच्या सणाचे महत्व खूप आहे. खेड्यात, शहरात होळी ही साजरी केली जाते.

आम्ही होळी येण्याआधीच होळी खेळायला सुरवात करतो. एकमेकांच्या आंगावर पाणी, कलर टाकायला खूप मजा येते. सकाळी उठल्या पासून ते पूर्ण २-३ दिवस आमची होळी खेळतो. होळी च्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. तसेच मसाले भात आणि आमटी असा बेत असतो. मला सर्वच खूप आवडते.

आमच्या गावात होळी पेटवण्याचे एकच ठिकाण आहे. या ठिकाणावर होळी पेटवली जाते. या ठिकाणाला होळीचा माळ असे म्हणतात. ही होळी शहरात खेड्यात परंपरागत ठरलेल्या ठिकाणी पेटविण्यात येते. असे म्हणतात की होळीचे ठिकाण हे दरवर्षी बदलायला नको. एकच स्थिर ठिकाण हवे.

ज्या ठिकाणी होळी पेटविल्या जाते तिथे एक खोल खड्डा केला जातो. त्यात आजूबाजूने काही लाकडे, कचरा टाकला जातो. खर तर होळीची कचऱ्याची करावी. पण आजकाल होळी मध्ये कचरा कमी व लाकडे जास्त ठेवली जातात. मधात झाडाची एक फांदी लावली जाते. सर्व गल्लीतला कचरा गोळा करून ही होळी व्यवस्थित बांधण्यात येते. व एरंडाची एक फांदी देखील त्यात ठेवल्या जाते. आम्ही आधीपासूनच होळीसाठी शेणाच्या शेंगोड्या बनवतो. खेड्यातला मुलांचा तो आवडता छंद. ह्या शेंगोडया ची एक माळ करून होळी ला लावण्यात येते.

तयार केलेल्या होळीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पूजा , आरती करतात. व नंतर होळी पेटविल्या जाते. होळी पेटल्या नंतर सर्व एकच जल्लोष करतात. होळी मध्ये सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो असे म्हणतात. म्हणून आपल्या मध्ये असणारा अहंकार. द्वेष, कपटी पणा हा सर्व होळीच्या आगीत टाकला जातो. होळी च्या अवतीभवती काही लोक फेऱ्या मरतात. तर काही गाणी म्हणतात. नाचतात.

तुमच्यासाठी सुचवलेले – रंगपंचमी माहिती मराठी

खूप पूर्वीच्या काळापासून हा सण साजरा केला जातो. या सणाची सुरवात कशी झाली हे अजुन पण माहिती नाही. पारंपरिक पद्धती नुसार चालत आलेला हा सण तशाच प्रकारे साजरा केला जातो. होळी च्या सणाचा उल्लेख हा पुराणकाळातील पुस्तकात देखील केला आहे.

दरवर्षी हा सण मार्च महिन्यात येतो, मराठी महिन्या नुसार फाल्गुन महिन्यात येतो. होळी चा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमी ल सर्वच लोक मोठ्या उत्साहाने रंगाची पाण्याची होळी खेळतात. एकमेकांना रंग लावून आपल्या मनातील त्यांच्या विषयीचा राग, द्वेष, कमी होतो व आपुलकी वाढते, प्रेम वाढते.

होळी हा प्रचंड उत्साहाचा सण आहे. लहान मूल तर या सणाची आतुरतेने वाट पहात असतात. अशा प्रकारे हा होळी सण आनंदात साजरा केला जातो.

अश्या प्रकारे आपण होळी सणाची माहिती पहिली.

Also read:

लोकमान्य टिळक यांच्या विषयी संपूर्ण माहिती

कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती

Leave a Reply

Your email address will not be published.