अजिंठा वेरूळ लेणी बद्दल संपूर्ण माहिती । Ajintha verul Leni Information in Marathi

Ajintha verul Leni Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  “अजिंठा वेरूळ लेणी बद्दल संपूर्ण माहिती । Ajintha verul Leni Information in Marathi”  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

अजिंठा वेरूळ लेणी बद्दल संपूर्ण माहिती । Ajintha verul Leni Information in Marathi

महाराष्ट्र राज्यात असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्या हा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. प्राचीन गुहांना ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकापासून चा इतिहास लाभला आहे.

सह्याद्री डोंगराच्या कुशीत वसलेल्या ह्या लेण्या वर जाणे आज हि वाटत असले तरी, निरनिराळ्या भिक्षूंचे ते वसतिस्थान आहे.

अजिंठा वेरूळच्या लेण्या या पर्यटकांसाठी तर अगदी पसंतीचे झालेले ठिकाण आहे.

अजिंठा मधील लेण्यातील रंगीत चित्रे, वेरूळ मधील मूर्ती आणि एलिफंटा गुफा मधील देवी अवशेष पाहून या ठिकाणी येण्यासाठी पर्यटक अधिकच आकर्षित होत आहेत.

अजिंठा वेरुळच्या गुंफा आणि अजिंठा वेरूळच्या लेण्या म्हणजे महाराष्ट्राचे गौरव स्थान आहे.

पाषाणातून कोरून काढलेल्या या लेण्या पाहण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. कित्येक शतकांपूर्वी भारतीय कारागिरांनी त्यांच्या कलाकृतीतून काढलेल्या सुंदर्तेचे व सौंदर्य दृष्टी कळून येते. कला आणि इतिहास या विषयी अधिक अधिक माहिती जाणून घेणारा कलाप्रेमी व इतिहास प्रेमी चे हे केंद्रस्थान आहेत.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार, अजिंठा-वेरूळ चालेना सुरक्षित केल्या असून जागतिक वारसांच्या स्मारकांच्या यादी या गुफांचे नाव नोंद करण्यात आले आहे.

अजिंठा वेरूळच्या लेण्या कुठे आहेत:

  महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरापासून सुमारे नव्वद किलोमीटरच्या अंतरावर सह्याद्री टेकड्यांमध्ये असलेल्या अजिंठा या गावाा मध्ये या लेण्या वसलेल्या आहेत.

येथे असलेल्या 30 गुफांनी शीलाकाय घोड्या च्या नाले सारखा आकार धारण केला आहे. येथे असलेल्या काही गुंफांमध्ये अंतर्गत दालने सुद्धा आहे. अखंड पाषाणापासून बनलेल्या या गुफा केवळ हातोडी च्या साह्याने आणि बुद्धा वरील श्रद्धेतून आणि प्रेरणेतून निर्माण झाल्या असाव्यात.

 अजिंठा वेरूळ लेण्यांची निर्मिती:

अजिंठा वेरूळच्या लेण्या ह्या इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन पूर्व चौथे शतक अशा या एवढ्या मोठ्या प्रत्येक कालखंडात निर्माण केलेल्या 29 लेण्या आहेत.

या लेण्यांची निर्मीती ही अखंड पाषाणात हातोडी च्या साहाय्याने कोण व बुद्धावर असलेल्या श्रद्धेतून आणि प्रेरणेतून केली असावी. बौद्ध भिक्षूंसाठी राहण्यासाठी आणि अध्ययनाचे काम करण्यासाठी कारागीरांनी येथे दालने व विहार खोदून काढले. अजिंठा वेरूळ मधील लेण्यातील बहुतांशी गुहांमध्ये भिंतीवर खांबावर आणि प्रवेश दारावर सविस्तर कोरीवकाम केल्याचे आढळते.

अजिंठा वेरूळ मध्ये 29 लेण्या असाव्यात आणि या लेण्यांची निर्मिती करण्यासाठी सुमारे सहाशे वर्षांचा काळ लागला.

तत्कालीन वेशभूषा, केशभूषा, वस्त्रे, संगीत साधने ,दागदागिने, चालीरीती आणि स्थापत्यशास्त्राचे विवेचन यातून मिळते. भारतीय अभिजात कलेच्या या संकलनातून एक विशिष्ट शैली निर्माण झाली.

बुद्धानं बरोबर येथील लेण्यांचा विहार आणि प्रचार जगभरातील विविध भागात झाला.

अजिंठा वेरूळ येथे असलेल्या विविध प्रकारची चित्रे श्रीलंकेतील सिगिरिया, अफगाणिस्तानमधील बामियान आणि तिबेट, नेपाळ, चीन आणि जपान येथील मंदिरांमध्ये व धार्मिक ठिकाणी पहायला मिळतात.

अजिंठा वेरूळ लेण्यांची रचना:

  अजिंठा वेरूळ लेण्यांची रचना आहे खूप प्राचीन काळातील आहे. अजिंठा येथे एकूण 29 लेणी आहेत.या सर्व लेण्या वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. या सर्व लेण्या नदीपात्र पासून पंधरा ते तीस मीटर उंचीवर आहेत.

हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी 9 व 10 क्रमांकाची लेणी चैत्यगृह आहे. तर 12,13 आणि 15 क्रमांकाची लेणी या विहार आहेत.

महायान कालखंडातील लेण्यांपैकी 19,26 आणि 29 क्रमांकाच्या लेण्या चैत्यगृह आहे तर बाकीच्या सर्व लेण्या या विहार आहेत.

हे सर्व विहार साधारणता चौकोनी आकाराचे असून त्यांची लांबी रुंदी ही 17 मीटर एवढी आहे. हे सर्व विहार भिक्षूंना राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी बांधले होते. कालांतराने या विहार मध्य मूर्ति स्थापना करण्यात आली व सोपा आणि अंगाने यांचे बांधकाम करण्यात आले.

तर सर्व चैत्यगृहे पारंपारिक पूजा विधी करण्यासाठी बांधले होतो.

अजिंठा वेरूळ लेण्यांचा इतिहास:

  अजिंठा वेरूळ लेण्यांचा इतिहास फार जुना आहे. असे मानण्यात येते की या लेण्यांची निर्मिती ही, व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी झाली. या लेण्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय मिळावा असा होता.

परंतु कालांतराने या लेण्यांचे परिवर्तन नितांत सुंदर चित्रकला व शिल्पकला दलनांत झाले.

परंतु या लेण्यांची मूळ रचना ही धार्मिक शिक्षण संस्थेचे सारखी आहे.

इतिहासातील काही पुरातत्त्व पुराव्यानुसार असे कळून आले किया लेण्यांची निर्मितीही 2 वेगवेगळ्या कालखंडात झाली.

लेण्या क्रमांक 9,10,11,12,13 व 15-अ हीनयान या कालखंडात कोरल्या असाव्यात.हीनयान हा कालखंड सुमारे इसवी सन पूर्वीच्या दुसऱ्या शतकात सुरू झाला.

ह्या लेण्या सोडून 1 ते 29 मधील बाकी सर्व लेण्या या महायान कालखंडात निर्मित केल्या असाव्यात. ह्या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते की, महायान लेणी ही वाकाटक राज्याच्या काळात निर्मिती केली असावी.

 अजिंठा वेरूळ येथील सर्व लेण्या:

  अजिंठा वेरूळ येथे खूप पुरातन काळातील एकूण 29 लेण्या पाहायला मिळतात. या सर्व लिहिण्याची माहिती पुढील प्रमाणेेे,

 लेणी क्रमांक एक:

  या लेणी मध्ये वीस खांबावर आधारित एक दालन तयार करण्यात आले आहे. तसेच या खांबावर सुंदर नक्षीकाम सुद्धा केलेले दिसते. भगवान बुद्धांच्या पूर्वज यावर आधारित जातक कथा या ठिकाणी बघायला मिळतात.

तसेच बुद्धांच्या विविध प्रकारच्या मुद्रा, दरबार दृश्य, पक्षी, फुले,फळे यांच्या छान वरील अंकल सुद्धा पाहायला मिळते.

 लेणी क्रमांक 2:

  या लेणीमध्ये डाव्या बाजूस हंसाच्या जन्माची कथा आहे. बुद्धांचा जन्म व छतावरील नक्षीकाम यांच्या अंकन या लेणींमध्ये बघायला मिळते.

 लेणी क्रमांक 3:

  या लेणीतील कुठलेही अवशेष पहायला मिळणार नाहीत कारण ही लेणी पूर्णता अपूर्णावस्थेत आहे.

 लेणी क्रमांक 4:

 अजिंठा वेरूळ येथील सर्वात मोठे लेणे म्हणून या लेणीला ओळखले जाते

या लेणी मध्ये एकूण 28 खांब आहेत. तसेच प्रवेश दरवाज्यावर द्वारपाल यांची जोडी आहे व लेणीच्या आत मध्ये सहा बुद्धांच्या मोठ्या मुर्त्या सुद्धा आहेत.

 लेणी क्रमांक 5:

 या लेणी मध्ये बुद्धाच्या काही आकृत्या कोरलेल्या आहेत. परंतु या लेण्या सुद्धा अपूर्ण अवस्थेत आढळतात.

 लेणी क्रमांक 6:

  हे लेणी दोन मजली असून सभागृहात बुद्धांची पद्मासन मुद्रेतील मोठी मूर्ती आहे. तसेच प्रवेशद्वारावर मगरीचे आणि फुलांचे अर्धगोलाकार आर्य बनवले आहे

 लेणी क्रमांक 7:

  या लेणी मध्ये आसनस्थ बसलेली बुद्धाची एक मूर्ती आहे. आणि या मूर्ती मागेली भिंतीवर प्रभा मंडळ कोरलेली आहे.

 लेणी क्रमांक 8:

  या लेणीमध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी व प्राचीन इतिहासाचा संबंधित काहीही कोरलेले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे प्राचीन अदृश्य नाही. त्यामुळे पर्यटक विभागाने या ठिकाणी विद्युत अग्र स्थापित केले आहे.

 लेणी क्रमांक 9:

  या लेणीतील चैत्या ची रचनाही काटकोन आकारात केलेली आहे. चैत्याच्या मध्यभागी अखंड दगड असून त्यावर कोरलेला अर्धवर्तुळाकार स्तूप आहे. तसेच या लेणीतील भिंतीवर बुद्धाचे भावदर्शी अस्पष्ट चित्रे कोरलेली आहेत.

 लेणी क्रमांक 10:

  ही लेणी हीनयान कालखंडातील विहार आहे. या लेणी मध्ये 40 खांबा असून त्यावर सुंदर रेखीव काम केलेले आहे. या लेणीतील स्तुपांवर पाली भाषेतील लेख धम्म लिपीत लिहिलेले आहेत.

 लेणी क्रमांक 11:

  या लेणी मध्ये एक मोठा सभामंडप आहे. व या सभामंडपातील पूजास्थानी बुद्धाची मूर्ती आहे.

 लेणी क्रमांक 12 ते 15:

  या लहरी मध्ये कुठल्याही प्रकारची विशेष कोरीव काम किंवा मुर्त्या नाही.

 लेणी क्रमांक 16:

  या लेणी मध्ये खूप महत्त्वाचे चित्रे आहेत.. बुद्धाच्या जीवनातील सर्व घटना या लेणीमध्ये दाखवले आहेत. येथे कथकली नृत्याचे चित्र उल्लेखनीय आहे. आत मध्ये बुद्धाची भव्य मूर्ती आहे. छतावर ही सुंदर चित्रकला कोरलेली आहे.

 लेणी क्रमांक 17:

  या लेणी मध्ये बुद्धाच्या जीवनातील सर्व प्रसंग कोरलेले आहेत. भगवान बुद्ध आपली पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल त्यांच्याकडे भिक्षा मागत असल्याचे चित्र प्रसिद्ध आहे.

 लेणी क्रमांक 18:

  या लेणीमध्ये कुठलेही कोरे काम नसून यामध्ये एक तळे आहे.

 लेणी क्रमांक 19:

  या लेणी ला घोड्याच्या नाल्याच्या आकाराचा विहार आहे. तिन छत्रीचा एक वस्तू पण येथे असून त्यावर बुद्धाच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत.

 लेणी क्रमांक 20-21:

ही लेणी पूर्णता अपणा असलेली विहार आहे. या विहारात नक्षीकाम केलेले स्तंभ आहेत. भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना प्रवचन देण्याचे चित्र या भिंतीवर आहेत. समृद्धीची देवता हरिता, तिचे सेवक सर्पराज नागाचा दरबार अशी विविध शिल्पे याठिकाणी कोरलेली आहे.

 लेणी क्रमांक 22:

  या लेणीमध्ये साथ मनुुुषीी बुद्ध बोधीवृक्षाखाली मैत्रीयाा सोबत चित्रीत केलेल्या दिसतात.

 लेणी क्रमांक 23:

 ही लेणी सुद्धा अपर्णा असून या लेणीतील खांबावर कलात्मक कलाकृती आहे.

 लेणी क्रमांक 24:

  क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे लेणे सर्वात मोठे आहे. त्याची भव्यता आणि कलात्मकता वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते.

 लेणी क्रमांक 25,26:

लेण्या्यां मध्ये भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण केलेले आहे. तसेच बुद्ध एका वृक्षाखाली बसलेले चित्र सुद्धा दिसते.

 लेणी क्रमांक 27:

  या लेणी ची रचना दोन मजले असली तरी हे लिहिणे अपूर्णावस्थेत आढळते.

 लेणी क्रमांक 28:

 ही लेणी उंच दगडावर आहे. या लेण्यात संभवा अंगण सुद्धा आहे.

 लेणी क्रमांक 29:

 ही लेणी सुद्धा उंच दगडावर आहे.  या लेण्याचे फक्त खोदकाम झालेले दिसते. येथील विहार साधारणपणे 17 मीटर उंच आहेत.

FAQ

1. अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर: अजिंठा वेरूळ लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका सोयगाव येथील अजिंठा या गावात या लेण्या वसलेल्या आहेत.

2. महाराष्ट्रातील लेण्यांची यादी?

उत्तर: महाराष्ट्र राज्यात भरत चालेना आढळतात. त्यातील सर्व लेण्या ची यादी पुढील प्रमाणे-
1. मुंबई येथे असणाऱ्या लेण्या: महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी कान्हेरी, कोंदिवटे, घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर आणि लोणाड इत्यादी लेण्या आहेत.
2. लोणावळा येथे कारले, कोंडाणे, बेडसे, येलघोल त्या दिलेल्या आहेत.
3. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत.
4. पुणे जिल्ह्यातील पातळेश्वर लेणी

3. महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध चित्र लेण्या कोठे आहेत?

उत्तर: महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध चित्र लेण्या औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत. या लेण्या वाकाटक, चालुक्य आणिले राष्ट्रकूट काळात निर्माण झाल्या.
या लेण्यांमध्ये असलेल्या स्थापत्यकला, चित्रकला शिल्पकला यासाठी या लेण्या जगप्रसिद्ध झाल्या आहेत.

4. वेरुळ गावचे पाटील कोण होते?

उत्तर: वेरूळ गावाच्या पाटिलकीचा वारसा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे होता. तसेच तेथील आसपास च्या परिसराची जहांगिरी सुद्धा होती.

 तर मित्रांनो! “अजिंठा वेरूळ लेणी बद्दल संपूर्ण माहिती । Ajintha verul Leni Information in Marathi”  वाचून आपणास आवडला असेल तर ,तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

“अजिंठा वेरूळ लेणी बद्दल संपूर्ण माहिती । Ajintha verul Leni Information in Marathi”  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

 धन्यवाद!

1 thought on “अजिंठा वेरूळ लेणी बद्दल संपूर्ण माहिती । Ajintha verul Leni Information in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *