अंधश्रद्धा एक सामाजिक आजार मराठी निबंध | अंधश्रद्धा एक सामाजिक आजार वैचारिक लेखन

अंधश्रद्धा एक सामाजिक आजार मराठी निबंध | वैचारिक लेखन [500 words]

अंधश्रद्धा एक सामाजिक आजार मराठी निबंध
अंधश्रद्धा एक सामाजिक आजार मराठी निबंध

आपण आज २१व्या शतकात जगत आहे तरीपण लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून आहेत. साधूबाबा, तांत्रिक, ब्राह्मण ,मौलवी ह्या लोकांनी सामान्य जनतेच्या विश्वासाचा बाजार मांडला आहे. त्यांचा श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेला बळी पडत आहे. सामान्य जनता या ढोंगी बाबांच्या जाळ्यात अडकून पैसा, वेळ नष्ट करत आहे.

खरंतर असे म्हणायला हवे की पूर्वीच्या काळापासून अंधश्रद्धा आपल्याला श्राप मिळालेला आहे. पूर्वीचे लोकही अंधश्रद्धेला बळी पडून प्राण्यांचा, माणसांचा बळी घेत आले. ढोंगी साधू जे म्हणतात त्यांच्यानुसार वागत आले आणि स्वतःचं नुकसान करत आले. यातून फक्त आणि फक्त त्रास होतो दुसरं काही नाही.

श्रद्धेमुळे आपले जीवन सुधारते तर अंधश्रद्धेमुळे आपले जीवन बरबाद होते. ढोंगी साधू आपल्याला भीती दाखवतात. हे नाही केलं तर तुमचं नुकसान होईल, याचा बळी नाही दिला तर याचे नुकसान होणार, यज्ञ करा, ही पूजा करा, हे पाठ करा तर तुमचा फायदा होईल, अशी वेगवेगळ्या प्रकारची भीती दाखवून आपल्याकडून पैसा लुबाडतात आणि लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटतात.

आजच्या युगातही लोक चांगल्या कामाला जातांना मांजर आडवी गेली तर काम होणार नाही, पाल चुकचुकली तर काम होणार नाही, तिघेजण गेलं तर काम बिघडते, इत्यादी गोष्टी मानतात. खरतर या गोष्टींचा आणि आपल्या कामाचा काही संबंध येत नाही. आपले काम हे आपण केलेल्या कार्यावर, यशापयशावर निर्भर असते. आपण चांगले काम केले तर आपल्याला यश नक्कीच मिळेल त्यात मांजर आडवी जाण्याचा किंवा आणखी कोणत्या गोष्टीचा काहीही दोष नसतो. ही फक्त आणि फक्त एक अंधश्रद्धा आहे आणि मूर्खपणा आहे.

अंधश्रद्धेमुळे आपण कितीतरी वेळा आपलं नुकसान करून घेतो आणि दोष मात्र मांजर आडवी गेली म्हणून माझे काम झाले नाही, ते कपडे घातले म्हणून काम झाले नाही, शंका आली म्हणून काम झाले नाही असं म्हणून मोकळं होतो.

मात्र अशा अंधश्रद्धा बाळगणाऱ्या माणसांवर हसायला येते आणि त्यांची कदर ही येते की ही इतकी कशी काय मूर्खपणा करू शकतात.

अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय? | अंधश्रद्धा एक सामाजिक आजार मराठी निबंध

अंधश्रद्धा म्हणजे कोणत्याही गोष्टीवर अथवा व्यक्तीवर विचार न करता विश्वास ठेवणे.

जो व्यक्ती खुप घाबरतो त्याच्या मनावर कोणत्याही गोष्टीचे दडपण जास्त असते तो व्यक्ती अंधश्रद्धेला लवकर बळी पडतो आणि स्वतःचे नुकसान करून घेतो.

भारतात मोठ्या प्रमाणात लोक अंधश्रद्धेचे बळी पडलेले आहे. लोक ढोंगी बाबा, मौलवी यांच्यावर विचार न करता विश्वास ठेवतात. हे पाखंडी बाबा लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांच्या समस्यांचे निराकारण म्हणून कितीतरी साधना आणि जादूटोणा करायला सांगतात आणि आपल्या पेट्या धनानी भरून घेतात.

भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये आपल्याला लोक अंधश्रद्धेचे बळी पडलेले दिसतात. प्रत्येक देशात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना लुबाडणारे लोक हे लोकांना भीती दाखवून अंधश्रद्धा त्यांच्या मनात घालून पैसा लुबाडत असतात.

अंधश्रद्धा निर्माण होण्याचे कारण

अपयश संपूर्ण स्वतःचे नसून त्याला काही कारण म्हणून त्याच अपयशाचे कारण म्हणून अंधश्रद्धा निर्माण झाली. विश्वासाची कमतरता, कोणतेही काम लवकर व्हावा यासाठी घाई अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अंधश्रद्धा वाढत जाते.

अंधश्रद्धेमुळे नुकसान

अंधश्रद्धेचे अनेक नुकसान आहे. अंधविश्वासाने जीव, धन, संपत्ती आणि सन्मानाची हानी होते. पाखंडी तांत्रिक जादूटोणा करण्यासाठी लोकांकडून हजारो लाखो रुपये मागतात. या शिवाय प्राणी तसेच लहान मुलांचे बळी देखील घेतली जातात. अंधश्रद्धेमुळे निष्पाप प्राण्यांचा जीव जातो.

अंधविश्वासामुळे नुकसान आणि फक्त नुकसानच होते.

“श्रद्धावान् लाभते ज्ञानम्”असे म्हटले जाते पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखायचा कसा? श्रध्देने ज्ञान मिळते आणि अंधश्रद्धेमुळे अज्ञान मिळते. श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा मानवी जीवनावर जबरदस्त प्रभाव असतो. अंधश्रद्धा हे आपले जीवन भीतीने ग्रासून टाकते.

अंधश्रद्धेला मानवाच्या आयुष्यातून काढण्यासाठी महान विचारवंत “नरेंद्र दाभोळकर” यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सुरू केले. कार्यात काही लोकांना त्यांनी साथ दिली तर बरीच लोकांनी त्यांना विरोध केला. या कार्यातून त्यांनी लोकांना अंधश्रद्धेचा दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. काही लोकांनी त्यांना साथ दिली असून काही लोक बाहेर निघाले पण काही असे होते यातून ते बाहेर निघू शकले नाही.

जोपर्यंत अंधश्रद्धा बाळगणारे लोक आहे तोपर्यंत नुकसान होतच राहील. यावरुन आपल्याला लक्षात येते की अंधश्रद्धा हा मानवाला मिळालेला सर्वात मोठा श्राप आहे.

अशाप्रकारे आपण ‘अंधश्रद्धा एक शाप ‘ या विषयावर आपण माहिती पाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *