बाभुळ झाडाविषयी संपूर्ण माहिती । Babul Tree Information in Marathi

Babul Tree Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” बाभुळ झाडाविषयी संपूर्ण माहिती । Babul Tree Information in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

बाभुळ झाडाविषयी संपूर्ण माहिती । Babul Tree Information in Marathi

या सृष्टी तालावर झाडां चे अस्तित्व हे सुमारे 37 कोटी वर्षापासून आहे. मानवी जीवनामध्ये झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाड हे माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे कारण झाडांपासून मिळणाऱ्या प्राण वायू मुळे सर्व सजीव सृष्टी आज आपले जीवन जगत आहे.

याच झाडांमधील एक विशाल वृक्ष म्हणून ओळखला जाणारा बाबुल वृक्ष. आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही “Babul Tree Information in Marathi” घेऊन आलोत. या आर्टिकल मध्ये तुम्हाला बाभूळ वृक्ष संबंधीची सर्व माहिती वाचायला मिळेल.

Babul Tree Information

भारतामध्ये सर्वसाधारण आता कुठेही आढळणारा वृक्ष म्हणजे बाभूळ वृक्ष. तसेच काटेरी वृक्ष म्हणून देखील बाबुल ओळखले जाते.

बाभूळ हे झुडूप रूपामध्ये किंवा वृक्ष रूपामध्ये आढळतात. बाभूळ हा फॅसेबी या फुलातील एक वृक्ष आहे.

बाबुलला इंग्रजीमध्ये Acacia असे म्हणतात तर मराठीमध्ये बाभूळ असे म्हणतात. संस्कृतमध्ये याला दीर्घ काटा असे म्हणतात. बाबूल चे शास्त्रीय नाव “अॅकेशिया नीलोटिका” असे आहे.

बाभूळ या वृक्षाचे मूळ अस्तित्व आफ्रिका आणि भारतीय उपखंडातील आहे. त्यासोबतच बाभूळ हा वृक्ष इजिप्त, म्यानमार व ऑस्ट्रेलिया या देशांत हे आढळतो.

परंतु भारतात बाबूल वृक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल.

बाबूल ही भारतातील सर्वात उपयुक्त आणि महत्त्वाची वनस्पती आहे. बाबूल चे वेगवेगळे उपयोग आहेत.

बाभूळ वृक्षाचे लाकूड खूप कठीण आणि टिकाऊ असते त्यामुळे बाभूळच्या लाकडांचा वापर हा फर्निचर साठी सुद्धा केला जातो. तसेच बाभूळ च्या सालीचा व शेंगांचा वापर कातडी कमावण्यासाठी, काळा रंग आणि शाई बनवण्यासाठी केला जातो.

बाबूल च्या झाडा ला येणारा डिंक आहात चिकट गेंद म्हणून वापरली जाते. हा डिंक खूप पौष्टिक असल्याने या डिंकापासून डिंक लाडू सुद्धा बनवतात.

भारताचा आणि आफ्रिका मध्ये बाभळीच्या कोवळ्या फांद्या दात घासण्यासाठी वापरतात, त्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात‌.

तसेच बाभळीच्या झाडांच्या पाला आणि शेंगा शेळ्यामेंढ्या चारा म्हणून खातात.

Babul Tree वर्णन:

बाभुळ हे झाड भारतामध्ये कुठेही येणारे झाड आहे. बाबुल हे रेताड जमिनीमध्ये उगवणारे झाड आहे.

बाभूळ हा उष्णकटिबंध प्रदेशात वाढणारा एक विशाल वृक्ष आहे. बाभूळ हे काटेरी वृक्ष असून त्याची उंची पाच ते दहा मीटर एवढी असते. बाबूल वृक्षाच्या खोडाची साल ही गडद तपकिरी किंवा जवळपासच कळया रंगाची असून जाड व टणक व कमी-अधिक प्रमाणात भेगाळलेली असते.

बाबुल वृक्षाला खूप फाट्या फुटलेल्या असतात. या वृक्षाची पाने संयुक्त आणि एक आड एक असून ती आनेक लहान पर्णीकांची‌ बनवलेली असतात.

प्रत्येक पानाच्या तळाला दोन, 1-5 सेंटी मीटर लांबीचे, पांढरट, अतिशय टोकदार, तळाशी पोकर आणि टोकाशी कठिण असेच काटे असतात.

पावसाळ्यामध्ये या वनस्पतीला असंख्य पिवळ्या रंगाची फुले येतात. या वृक्षाला फुले येण्याचा हंगाम हिवाळ्यामध्ये चालू होतो. फुलोरा मध्ये दहा ते वीस अशाप्रकारे पिवळ्या रंगाची फुले येतात.

तसेच बाभूळ वृक्षाला हिवाळ्यामध्ये चा शेंगा धरतात आणि त्या उन्हाळ्यापर्यंत झाडावर दिसतात.

बाभूळ वृक्षाच्या शेंगा पांढरट, पिवळसर आणि माळे सारखी शेंगा येते व त्या शेंगेच्या आत मध्ये दहा ते बारा अगदी लहान व चपट्या बिया असतात. बियांपासून रोपे सहज येत असल्याने या झाडाची लागवड केली जात नाही, हे झाडे कुठेही सहजरित्या उगवतात.

बाभूळ वृक्षाच्या जाती:

बाबुल वृक्षाच्या मुख्यता दोन जाती आढळतात. भारतामध्ये सर्वत्र या दोन्ही जातीचे बाभूळ वृक्ष आढळते.

1 गावठी बाभूळ

2. देव बाभूळ

Babul Tree उपयोग:

बाभूळ हे वृक्ष भारतामध्ये असंख्य संख्येने पाहिले जातात. तसेच या झाडांपासून बरेचसे उपयोग आपल्याला होतात.

1. बाबूल वृक्ष मध्ये टॅनिन नावाचे द्रव्य असते. हे द्रव्य वापरून रोग प्रतिबंध औषधे तयार केली जातात.

बाभूळ वृक्ष‌ कुठेही मोठ्या संख्येने आढळत असल्याने तसेच याचे लाकूड कठीण व टिकाऊ असल्याने यापासून फर्निचर, बांधकाम करण्यासाठी लागणारे फळ्या, विविध अवजारे बनवण्यासाठी वापरतात.

2. बाबुल वृक्षाचा दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे या वृक्षावर येणारा डिंक. या झाडाच्या खोडातून निघणारा पिवळसर रंगाचा डिंक अनेक औषधी गुणधर्म मध्ये वापरला जातो. बाबूच्या डिंका मध्ये 52 टक्के कॅल्शिअम आणि 20 टक्के मॅग्नेशियमचे प्रमाण असते. त्यामुळे हा डिंग आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.

3. भारतामध्ये आढळणाऱ्या जाणाऱ्या बाभळीचा डिंक हा औषधी गुणधर्मामध्ये तसेच चिटकवण्यासाठी गेंद म्हणून वापरला जातो. तसेच थंडीमध्ये बदामा सोबत

खाण्यासाठी सुद्धा हा डिंक उपयोगी पडतो.

अतिरक्त सार, मासिक पाळी यावर उपाय म्हणून बाभळीचा डिंक वापरला जातो.

4 . तसेच बाभळीचे फुले, पाने आणि फांद्या यांचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. टूथपेस्ट मध्ये सुद्धा बाबळी चा उपयोग होतो. त्यामुळे बाभूळ ची टाकाऊ पासून टिकाऊ वृक्ष आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जेवणाला निरोगी काढण्यासाठी उपयुक्त ठरते.

Babul Tree औषधी वापर:

बाभूळ वृक्षाचा औषधी वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरलेला हा बाभूळ वृक्ष आणि निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.

औषधी गुणधर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बाभूळ वृक्षाचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये सुद्धा या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

1. घशाची कोरड व त्यामुळे येणारा खोकला असल्यास बाभळीचा डिंक तोंडामध्ये धरल्यास हा खोकला कमी होण्यास मदत होते.

2. अतिसार, जुलाब अशा समस्या असल्यास बाबळीच्या झाडाची कोवळी पाने चावून खाल्ल्यास आराम मिळेल.

3. बाबळी मध्ये टॅनिन नावाचे द्रव्य असते, ज्याचा उपयोग रोग प्रतिबंधक औषधे तयार करण्या साठी केला जातो.

4. आयुर्वेदिक दंतमंजन यामध्ये बाभळीच्या आतील सालीचा वापर केला जातो.

5. टॉंन्सिल: जर कोणाला टॉन्सिल सारख्या रोगाचा त्रास होत असेल तर, बाभळीच्या पानांचा काढा करून त्यात, किंचित मीठ घालून पिल्यास किंवा गुळण्या केल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते.

6. खूप घाम येत असल्यास बाळज्ञरडा व बाभळीची पाने सममात्रा मध्ये वाटून अंगाला लेप लावून आंघोळ केल्यास घाम येत नाही.

7. अंग दुखी, मान दुखी, पाठ दुखी अशा समस्या असतील तर बाभळीचे साल, शेंगा,डिंक सम मात्रेत वाटून त्यामध्ये मोरिंगो पावडर मिक्स करून हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस एक चमचा सेवन केल्यास हा त्रास कमी होतो.

8. बाभळीच्या कोवळ्या शेंगा मध्ये सेंदवे मिठ घालून त्यांचा लोणचे करून रोजच्या आहारामध्ये हा लोणचा खाल्ल्यास अरुची, भूक न लागणे, जठराग्नी अशा समस्येतून मुक्तता मिळते.

9. बाभळीच्या काढायच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते तसेच सारखी पोट दुखी होत असल्यास बाभळीच्या सालीचा काढा ताकामध्ये मिक्स करून पिल्यास पोटदुखी थांबते.

10.यौन संक्रमित आजारांवर बाभळीचे दहा पाने, चमचाभर साखर ,2 काळा मिरी, पाच-सहा डाळींबाची पाने एकत्र करून वाटून ते  पाणी पिल्यास यौन संबंधित सर्व समस्या दूर होतात.

 तर मित्रांनो ! “बाभुळ झाडाविषयी संपूर्ण माहिती । Babul Tree Information in Marathi in Marathi” वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

“बाभुळ झाडाविषयी संपूर्ण माहिती । Babul Tree Information in Marathi”  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

Read Also :

 धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *