मानवी जीवनामध्ये खेळायला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण ते जाणतोच. जीवनामध्ये व्यक्तिमत्व निर्माण होण्यास समयसूचकता, निर्णय क्षमता विचार क्षमता ,कार्यक्षमता बुद्धिचातुर्य धैर्य, साहस व इत्यादी सर्वच गोष्टींची जाणीव आपल्याला खेळामुळे होते खेळामुळे आपल्याला हे गुण वाढीस लागतात त्यामुळे खेळाचे आणि आपल्या जीवनाचे किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्यातला आवडता खेळ माझा बॅडमिंटन (माझा आवडता खेळ निबंध बॅडमिंटन).
माझा आवडता खेळ निबंध बॅडमिंटन
आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात त्यामध्ये खो-खो ,कबड्डी बॅडमिंटन क्रिकेट ,हॉकी असे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात त्यापैकीच बॅडमिंटन हा त्याच्यामधला प्रमुख खेळ आहे .बॅडमिंटन या खेळाची सुरुवात 1900 शतकात मध्ये झाली ब्रिटिश काळात हा खेळ काही दिवसातच लोकप्रिय झाला होता .हा खेळ देशांमध्ये पूर्वीच्या काळापासूनच खेळला जात होता. या खेळायला खेळण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता भासत नाही त्यामुळे हा खेळ शहरात किंवा खेडेगावात कुठल्याही भागात खेळला जाऊ शकतो.

बॅडमिंटन हा एक असा खेळ आहे जो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवू शकतो हा खेळ लहान मुले किंवा मोठी मुले कोणी पण खेळू शकतात. मला बॅडमिंटन हा खेळ खूप आवडतो. बॅडमिंटन हा खेळ प्रत्येक शाळेत तर ते कॉलेजमध्ये खेळला जातो.माझ्या कॉलेज मध्ये या खेळाच्या स्पर्धा झाल्यानंतर या खेळात नेहमी मी जिंकायची.या खेळाने मला एक आत्मविश्वास,प्रेरणा दिली.तस बघितलं तर बॅडमिंटन खेळायला प्रत्येकी दोन व्यक्ती हव्या असतात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पी व्ही सिंधू, प्रकाश पादुकोण असे महान खेळाडू आहेत. एस बॅडमिंटन पटू नी आपल्या भारताचे नाव प्रसिद्ध केले आहे.
मला बॅडमिंटन हा खेळ लहानपणापासूनच खूप आवडतो दररोज संध्याकाळी मी माझ्या मैत्रिणी बरोबर बॅडमिंटन हा खेळ खेळते , खूप स्फूर्ती मिळते खेळून, असा ऐक वेगळाच आनंद मिळतो.एक दिवसभराचा ताण कमी होतो.टेंशन फी होत. शाळेमध्ये हे आम्ही बॅडमिंटन हा खेळ खूप खेळायचो मला त्या मध्ये अनेक पारितोषिक मिळालेली आहेत.बॅडमिंटन खेळण्यासाठी जास्त साहित्याची आवश्यकता नसते .मी या खेळातील कुशल खेळाडू आहे.
मला या खेळाचे प्रशिक्षण शाळेकडून मिळाले. शाळेत एका स्पोर्ट शिक्षकाने मला हा खेळ शिकवला. तसेच मला हा खेळ खेळायला माझ्या घरच्यांनी मला खूप प्रोत्साहन केले .माझे बॅडमिंटन मधील कौशल्य पाहून सर्व लोक माझे कौतुक करतात .मला त्या वेळेस खूप छान वाटते. या खेळानी मला माझी स्वतःची ओळख दिली. हा खेळ चार भिंतीच्या आत किंवा अंगणात किंवा मैदानात आपण सर्व ठिकाणी खेळू शकतो बॅडमिंटन हा खेळ खेळायला खूप मजा येते .
खेळात खेळण्यासाठी दोन व्यक्तींची किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्ती पण असतात. आणि एक फुल म्हणजेच शटलक्लॉक ची आवश्यकता असते. या खेळायला जे फुल वापरले जाते ते वजनाने खूपच हलके असते व बाहेरच्या हवेमुळे त्याची दिशा बदलू शकते या खेळामध्ये खेळाडू बॅट हातात घेऊन शटल क्लॉक. म्हणजेच बॅडमिंटनमधील फुल इकडून तिकडे मारतात बॅडमिंटनमधील फुल ही अतिशय कमी वजनाचे असते.खेळ खूप आवडतो, तसेच खेळायला देखील आवडतात त्यामधला बॅडमिंटन हा तर मला खूपच आवडतो, पण बँडमिंटन खेळामधली मजेत खूप वेगळी आहे खेळामुळे एक प्रकारची स्पर्धा निर्माण होते बॅडमिंटन खरोखरच एक रोमांचकारी खेळ आहे.
देशात दरवर्षी एक बॅडमिंटन खेळाचे आयोजन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केले जाते .याशिवाय ते जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळला जातो .जो खेळाडू जिंकतो त्याला पदक दिले जाते .आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील पुरुषच नव्हे तर आज महिला वर्गही सर्वात समोर बॅडमिंटन खेळत आहे . बॅडमिंटन हे कुठेही खेळला जाऊ शकते. लोकप्रिय खेळाडू प्रकाश पादुकोण आणि गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड ओपन स्पर्धा जिंकली होती .आणि अशा अनेक स्पर्धेत भारताचे नाव उंचावले होते हे खेळाडू इतर खेळाडूंना प्रेरणा देतात जेणेकरून भविष्यात ते चांगले खेळू शकतील.
बॅडमिंटन खेळामध्ये ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होते त्यामुळे हृदयासंबंधी रोग होत नाहीत.
बॅडमिंटन हा खेळ नियमित खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते तसेच आपल्या संपूर्ण शरीराचा विकास देखील होतो .तसेच आपली विचारशक्ती देखील वाढते. आणि आपण लठ्ठपणावर विजय मिळवू शकतो .बॅडमिंटन हा खेळ खेळल्याने ताणतणाव कमी होऊन रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो त्यामुळे हृदयविकार होत नाही बॅडमिंटन हा खेळ खेळल्याने हाताचे आणि पायाचे स्नायू मजबूत होतात हा खेळ खेळणारे व्यक्तीला कोणतेही काम करण्यास जास्त विलंब लागत नाही तसेच हा खेळ खेळला ने मन शांत राहते आणि आपण आनंदित राहतो. म्हणून मला हा खेळ खूप आवडतो.