बाल दिवस निबंध मराठी

बाल दिवस निबंध मराठी
बाल दिवस निबंध मराठी

बाल दिवस निबंध मराठी

मुले हे भारताचे भविष्य आहे. मुलांवरच उद्याच भविष्य आधारित आहे. आजचे मुलं हे उद्याचे भारताचे नागरिक आहेत. मुलं चांगल्या प्रकारे घडतील तेव्हाच उद्याच भविष्य घडेल. मुले ही देवाघरची फुले अस म्हटल्या गेलं आहे. म्हणून मुलांना योग्य प्रकारे घडवण हे आपल्या हातात आहे. संपूर्ण महाराष्ट्रत बाल दिवस हा अतिशय आनंदाने साजरा केला जातो. शाळेत बाल दिनानिमित्त अनेक कार्यक्रम समारंभ केले जातात.

बाल दिवस 14 नोव्हेंबर ला येतो. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ ला इलाहाबाद मध्ये झाला. पंडित जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलांविषयी खूप प्रेम , स्नेह वाटायचं. त्यामुळे मुलांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा. पंडित नेहरु यांना मुलांमध्ये खेळायला, हसायला, खूप आवडायचे म्हणून चाचा नेहरूंनी आपला वाढदिवस बाल दिवस म्हणून साजरा करायचे असे ठरवले. तेव्हा पासून बाल दिवस १४ नोव्हेंबर ला साजरा करण्यात येतो. भारत स्वतंत्र करण्या मागे पंडित जवाहलाल नेहरु यांचा खूप मोलाची भूमिका आहे. पंडित नेहरु यांना मुलांविषयी वेगळाच कुतूहल होत. पंडित नेहरूंना चाचा नेहरू म्हणायचे.

या बालदिनी तर अनेक लोक लहान अनाथ मुलांना आश्रमात जाऊन कपडे, जेवण, मिठाई देण्यात येते. तसेच काही प्रायव्हेट संस्था देखील त्यांना या दिवशी मुलांना आपल्या परीने काही भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन प्रफुल्लित होत. आश्रमात मुलांना घालायला चांगले कपडे, खायला पियाला मिळत नसल्याने त्यांना या सर्व गोष्टी त्या दिवशी मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य असते. एक वेगळाच आनंद त्यांना मिळतो. त्या मुलांसाठी हा बालदिवस खूप महत्त्वाचा असतो.

या बालदिनी शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व मुले पण त्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतात व नवनवीन खेळ खेळले जातात. वेगवेगळ्या स्पर्धा देखील या दिवशी घेण्यात येतात. मुलांना कोणालाच नाराज न करता सर्वानाच पारितोषिक दिले जातात. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा द्विगुणित झालेला असतो. मुलांना पुढे जाण्यासाठी ते एक प्रोत्साहन पर म्हणून मिळालेली प्रेरणा असते. कुठलेही रंगीबेरंगी कपडे घालून जाण्याची शाळेत मुभा असते. या दिवशी मुलांना चॉकलेट विविध प्रकारच्या मिठाई देण्यात येते.

बाल दिनी मुलांची सहल नेण्यात येते. त्यांना खेळायला, फिरायला मिळावं हा या मागचा उद्देश. मुलांचं भवितव्य हे त्यांच्या आईवडिलांच्या हातात असते. मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना एक समजदार, प्रामाणिक नागरिक बनवणे खूप गरजेचे आहे. उद्या हीच मुले देश घडवतील. पूर्ण कारभार हा त्यांच्याच हाती असणार आहे.

१४ नोव्हेंबर हा दिवस खास मुलांचा दिवस. मुले हेच राष्ट्राची संपत्ती आहेत. राष्ट्राची शान आहेत. मुलांना योग्य प्रकारे घडवणं, वळण देन हे आपल्या हातात आहे. मुलांची मानसिक, शारीरिक विकास व्हावा, म्हणून शासनाने खूप प्रकारच्या योजना देखील चालू केल्या आहेत. मुलांना आज शिष्यवृत्ती मिळत असल्याने मुलांना शिक्षण मोफत झालंय. कारण की अस म्हणतात मुले शिकली प्रगती झाली. आज मुलांचा योग्य प्रकारे विकास झाला, तरच राष्ट्रच भविष्य घडू शकेल. आज लहान मुलांना पोषक आहार म्हणून सरकारतर्फे धान्य वाटप करण्यात येत. १५ वर्ष पर्यंतच्या मुलांचा योग्य विकास व्हावा. त्यांना चांगलं पोषण मिळावं. यासाठी सरकारने ही योजना आखली आहे.

बालदिनी टीव्ही, रेडिओ वर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यांना प्रेरणा, कौशल्य, ज्ञान, मिळावं या साठी हे कार्यक्रम. आयोजित केले जातात. असा हा बलदिवस मुलांचे चैतन्य वाढविणारा, उत्साहवर्धक आहे.

“बाल दिवस निबंध मराठी” वाचल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *