फ्लेमिंगो – रोहित पक्षी बद्दल संपूर्ण माहिती । Flamingo Bird Information in Marathi

Flamingo Bird Information in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” फ्लेमिंगो – रोहित पक्षी बद्दल संपूर्ण माहिती । Flamingo Bird Information in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

फ्लेमिंगो – रोहित पक्षी बद्दल संपूर्ण माहिती । Flamingo Bird Information in Marathi

जगभरात पक्ष्यांच्या अनेक जाती आढळतात. परंतु या सर्वांमध्ये दिसायला अतिशय आकर्षक आणि आकाराने गिधडा त्याच्या दीडपट मोठा असा पक्षी म्हणजे फ्लेमिंगो पक्षी.

फ्लेमिंगो पक्षाला मराठीमध्ये “रोहित पक्षी” असे म्हणतात. हा पक्षी दिसायला बदका प्रमाणे असल्याने हिंदीमध्ये या पक्षाला “राजहंस” असे म्हणतात. तसेच रोहित पक्षाला “पाणपक्षी” म्हणून सुद्धा ओळखले जाते. मुख्यता पाण्याच्या ठिकाणी हे पक्षी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. हा पक्षी साधारणत एका पायावर उभा राहिलेला असतो.

 फ्लेमिंगो बर्ड ” फिनीकॉप्टेरीफॉर्मिस” या गाण्याच्या फिनीकॉप्टेरिडी या कुळातील आहे. हा एकच प्रजातीचा असून जगभरात या पक्षाच्या सहा जाती पाहायला मिळतात. यापैकी मोठा रोहित, लहान रोहि‌त या दोन जाती आफ्रिका युरोप आणि रशिया या देशांमध्ये आढळतात. तर, चीलियन रोहित, प्युना रोहित, अॅडियन रोहित आणि अमेरिकन रोहित या चार जाती अमेरिका देशात मोठ्या प्रमाणात आढळतात.

या हा पक्षी उडताना त्या पक्षाच्या पंखाची काळी किनार आणि गुलाबी रंग जुलै सारखा दिसतो म्हणून या पक्षाला “अग्निपंखी” पक्षी असेसुद्धा म्हणतात.

भारतातील मध्ये हा पक्षी मुख्यतः पुणे येथील उजनी धरण किंवा औरंगाबाद येथील जायकवाडी धरण या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात.

भारता मध्ये या पक्षाच्या दोन जाती आढळतात ते म्हणजे मोठा रोहित आणि लहान रोहित.

भारतात आढळणारा मोठा रोहिता हा दिसायला खूप आकर्षित असून त्याची उंची साधारणता 110 ते 115 सेंटिमीटर असून वजन दोन ते चार किलो ग्रॅम पर्यंत असते. या पक्षाचे शरीर गुलाबी रंगाचे असून पाय उंच व पातळ असतात. मान उंच व नागमोडी असते,तर चोच गुलाबी व जाडसर असून मध्येच पीळवाटल्यासारखी दिसते. या पक्षाचे शेपूट आखूड असते.

भारतात आढळणारा लहान रोहित हा दिवसाला खूप आकर्षित असून त्याची उंची साधारणता 80 ते 90 सेंटिमीटर असून वजन एक ते दोन किलो ग्रॅम पर्यंत असते. या पक्षाचा शरीराचा भाग हा गुलाबी किंवा पांढरा रंगाचा असतो. मोठा रोहित आणि लहान रोहित यांना ओळखायचे म्हणजे लहान रोहितच्या तो त्याचा बहुतेक बागा काळा रंगाचा असतो.

फ्लेमिंगो बर्ड या पक्षाच्या एका तळ्यामध्ये साधारणतः 20 लाख पक्षी असू शकतात.

फ्लेमिंगो बर्ड वर्णन:

दिसायला खूप आकर्षित असणारा हा पक्षी उंच असून फिकट गुलाबी, पांढरा किंवा लालसर पंखाचा असू शकतो. या पक्ष्याचे पाय लांब काठी सारखे दिसणारे साधारणता गुलाबी रंगाचे असतात. या पक्षाची चोच कठीण आणि लांब असून किंवा कळ्या रंगाची असते. तसेच या पक्षाची मान खूप लांब असते.

अशा प्रकारे दिसायला वैशिष्टपूर्ण असणारा हा पक्षी खूप आकर्षित असून बहुतेक जणांचा आवडता पक्षी आहे.

फ्लेमिंगो बर्ड कुठे आढळतात:

फ्लेमिंगो बर्ड हा पाणपक्षी असल्याने हा पक्षी साधारण ताप पाणी असलेल्या ठिकाणी पाहायला मिळतो. रोहित पक्षी प्रामुख्याने मुचळ पाणथळ जागा, उथळ पाण्याचे तलाव, दलदलीचे प्रदेश, सरोवर व खाडी अशा ठिकाणी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात.

हे पक्षी शक्यतो सरोवर आणि तलाव या परिसराच्या आसपास राहतात. बहुतेक हे पक्षी एका ठिकाणी आपले वास्तव्य करून राहत नाही. कारण त्यांच्या प्रजनन क्षेत्रात हवामान किंवा पाण्याच्या पातळीत होणाऱ्या बदलामुळे हे पक्षी सतत स्थलांतर करीत राहतात.

फ्लेमिंगो बर्ड स्थलांतर कसे करतात:

फ्लेमिंगो बर्ड चे स्थलांतर हे मुख्यता दोन प्रकारचे असते. भारतातल्या भारतात होणारे स्थलांतर ला स्थानिक स्थलांतर असे म्हणतात. यामध्ये राजस्थानमधील कच्छ प्रदेशात अधिवास असलेले फ्लेमिंगो बर्ड अण्णा वन निवाऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशातील इतरत्र ठिकाणी स्थलांतर करतात.

यातील अनेक पक्षी स्थलांतर करीत असताना मुंबई येथील भिगवण चा उथळ उजनी जलाशयाच्या परिसरात येतात. भारतात आढळणारे रोहित पक्षी म्हणजे छोटे रोहित म्हणजेच लेसर फ्लेमिंगो आहेत.

फ्लेमिंगो बर्ड अन्न:

रोहित पक्षी हा सर्व भक्षक पक्षी आहे. म्हणजेच मांसाहारी पक्षी आहे. हे पक्षी आकारमानाने गिधडा पेक्षा मोठे असले तरी लार्वा, सूक्ष्मजीव, लहान कीटक, आळ्या, निळ्या, हिरव्या आणि लाल एकपेशीय वनस्पती, मोलस्क, क्रस्टेशियन्स, खेकडे, कोळंबी आणी लहान मासे इत्यादी अन्न म्हणून खातात.

फ्लेमिंगो बर्ड( रोहित पक्षाचे) प्रकार:

रोहित पक्षाचे साधारणता जगभरामध्ये सहा प्रकार आढळतात. दिसायला खूप आकर्षित आणि पाणथळ जागी आढळणारा हा पक्षी जगभरात सर्वत्र आढळतो. या पक्षाचे प्रकार पुढील प्रमाणे;

1. ग्रेटर फ्लेमिंगो (Greater Flamingo):

ग्रेटर फ्लेमिंगो हे पक्षी आफ्रिका, दक्षिण युरोप, पश्चिम आशिया आणि दक्षिण आशिया मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हा पक्षी साधारणता 36 ते 50 इंचा असून त्याचे वजन तीन ते चार किलो ग्रॅम पर्यंत भरते.

ग्रेटर फ्लेमिंगो पक्षाची खूप लांब मान, मोठे विचित्र बिल आणि खूप गुलाबी रंगाचे पाय व पांढऱ्याशुभ्र रंगाच्या पंखांवर गुलाबी रंगाची शेड्स खूप आकर्षित करते. ग्रेटर फ्लेमिंगो फ्लोक्स किंवा कॉलनी नावाच्या गटामध्ये राहतात.

2. लेसर फ्लेमिंगो ( Lesser Flamingo):

लेसर फ्लेमिंगो या पक्षाची जात फ्लेमिंगो ची सर्वात लहान प्रजाती म्हणून ओळखली जाते. पक्षाचा पिसारा गुलाबी आणि पांढर्‍या रंगाचा असतो. मान लांब असून चोच कळ्या रंगाची टीप असलेली गडद लाल रंगाचे असते. पिवळसर केशरी रंगाचे डोळे आणि लालसर तपकिरी गडद नंगी त्वचा. लाल आवरण असलेले लांब व पातळ गुलाबी रंगाचे पाय.

लेसर फ्लेमिंगो पक्षाच्या नर आणि नादी या दिसायला सारखेच असतात. हे पक्षी मुख्यता एक पेशीय वनस्पती आणि क्रिस्टेशियन्स या प्रकारचा आहार घेतात.

लेसर फ्लेमिंगो मुख्यता पूर्व आफ्रिका दक्षिण आफ्रिका पाणी आशियातील ग्रेट रिफ्ट व्हॅली मध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळतात.

3. चीलियन फ्लेमिंगो ( Chilean Flamingo):

चीलियन फ्लॅमिंगो या पक्ष्याचे पंख गडद लालसर रंगाचे असतात. त्याचबरोबर या पक्षाला गुलाबी रंगाचा पिसारा असतो. या पक्षाचे पाय लांब काठी सारखे आणि राखाडी रंगाचे असतात. या पक्षाची उंची 110 ते 130 सेंटीमीटर पर्यंत असते. हे पक्षी मुख्यतः दक्षिण अमेरिकेत आढळतात. त्यासोबतच पेरू, दक्षिण-पूर्व ब्राझील या देशांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात.

4. अॅंडियन फ्लेमिंगो ( Andean Flamingo):

अॅंडियन फ्लेमिंगो पक्षाचा रंग फिकट गुलाबी असून वरचा भाग गडद रंगाचा असतो. या प्रकाराचा पक्षाला फिकट गुलाबी रंगाचे चोच असते. डोळे गडद तपकिरी रंगाचे असतात. या प्रकारच्या पक्षाचे नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. परंतु रोहित नर हा मादी पेक्षा आकाराने थोडा मोठा असतो.

फ्लेमिंगो पक्षी एकपेशीय वनस्पती आणि डायटॉम्स या प्रकाराचा आहार सेवन करतात. हे पक्षी मुख्यता चिली आणि उत्तर अर्जेंटिनाच्या प्रदेशात आढळतात.

5. अमेरिकन फ्लेमिंगो ( American Flamingo):

अमेरिकन फ्लेमिंगो पक्ष्यांचा रंग फिकट गुलाबी रंगाचा असून उड्डाण करणारे पंख काळा रंगाचे असतात. या पक्ष्याचे पाय गुलाबी रंगाचे असून चोच कळ्या* रंगाची असते. या पक्षांची उंची साधारणता 120 ते 140 सेंटीमीटर असते. हे पक्षी आहरांमध्ये एक पेशीय वनस्पती, कीटक, लहान मासे आणि कोळंबी यांचे सेवन करतात.

6. जेम्स फ्लेमिंगो ( Jemes Flamingo):

जेम्स फ्लेमिंगो या पक्षाची मान उंच व लांब असते. या पक्षांना गुलाबी रंगाचा पिसारा असतो प्राथमिक उड्डाण करणारे पंख हे फिकट गुलाबी रंगाचे असतात. या पक्षाच्या डोळ्याभोवतालची त्वचा लाल आणि चमकदार असते. तसेच पिवळसर आणि चमकदार चोच असते.

या पक्ष्यांची उंची साधारणता 90 ते 95 सेंटीमीटर पर्यंत असते. पक्ष मुख्यता दक्षिण ब्राझील, पेरू, उत्तर-दक्षिण अर्जेंटिना येथे मोठ्या संख्येने पहायला मिळतात.

फ्लेमिंगो पक्षाबद्दल चे काही तथ्य:

1. आज पर्यंत झालेल्या फ्लेमिंगो पक्षाच्या नोंदीनुसार असे कळून येते, फ्लेमिंगो पक्षी हा लहान कळपात राहत नाही ह्या पक्ष्यांचा एका थव्यामध्ये वीस लाख पक्षी‌असू शकतात.

2. ग्रेटर फ्लेमिंगो हा पक्षी इतर प्रजाती पेक्षा सर्वात मोठा आणि व्यापक पक्षी आहे.

3. रोहित पक्षाचा रंग जरी गुलाबी असला तरी या पक्षाला जन्मलेली पिल्ले ही सुरुवातीला राखाडी रंगाचे असतात.

4. फ्लेमिंगो हा शब्द लॅटिन भाषेतील शब्दापासून बनला आहे. फ्लेमिंगो शब्दाचा अर्थ आग असा होतो.

5. असे म्हणतात की जंगलात राहणाऱ्या रोहित पक्षाचे आयुष्य वीस ते तीस वर्षाच्या असू शकते तर कैदेत असलेल्या रोहित पक्षाचे आयुष्य पन्नास वर्षे असू शकते.

तर मित्रांनो! “Flamingo Bird Information in Marathi” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” फ्लेमिंगो – रोहित पक्षी बद्दल संपूर्ण माहिती । Flamingo Bird Information in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

Read Also :

 धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *