कलौंजी म्हणजे काय? आणि कलौंजी चे फायदे । Kalonji in Marathi

Kalonji in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” कलौंजी म्हणजे काय? आणि कलौंजी चे फायदे । Kalonji in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

कलौंजी म्हणजे काय? आणि कलौंजी चे फायदे । Kalonji in Marathi

आपल्यातील बहुतांश जणांनी Kalonji हे नाव खूप वेळा ऐकले नसेल. त्यामुळे कालौंजी बद्दल बरीच माहिती आपणास माहिती नसेल. परंतु कालौंजी चे बरेच फायदे आणि उपयोग आहे. मनुष्याच्या आरोग्यासाठी कालौंजी एक प्रकारे वरदान ठरते.

त्यामुळे ज्या लोकांना कालौंजी बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही आजचे हे आर्टिकल घेऊन आलोत. “Kalonji in Marathi” यामध्ये तुम्हाला कालौंजी विषयी संपूर्ण माहिती वाचायला मिळेल.

कालौंजी (Kalonji) माहिती :

सर्वसाधारण पणे आपण जरी कालौंजी म्हणून ओळखत नसलो तरी,कालौंजीचे शास्त्रीय नाव हे नायजेला सॅटिवा असे आहे.

कालौंजी चे बीज जगभरातील विविध सभ्यतांमध्ये शतकानुशतके विविध प्राणी आणि मानवी आजारांवर उपयुक्त मानले जातात.

आतापर्यंत असंख्य शास्त्रज्ञाच्या अभ्यासानुसार, कलौंजीचे‌ बीज त्यांचे मुख्य सक्रिय घटक, थायमोक्वीनोन विविध आजारांन विरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त ठरतात.

कालौंजीच्या बियांना इंग्रजीमध्ये black seeds अथवा Nigella Seeds असे म्हणतात.

भारतीय पाककला मध्ये कालौंजी च्या बिया‌या अण्णाला स्वाद देणारा एक मसाला च्या रूपात वापरल्या जातात.

भारतात सुकलेल्या कालौंजी च्या बिया रस्सा भाजी, डाळ,सांबर अथवा इतर विविध भाज्यांमध्ये मसाला म्हणून वापरल्या जातात.

 बाजारा मध्ये मिळणारे फास्ट फुड म्हणजेच समोसा कचोरी अशा विविध पदार्थाला खुसखुशीत आणि स्वादिष्ट करण्यासाठी कालौंजी च्या बिया वापरल्या जातात.

नेहमीच्या आहारामध्ये कालौंजी च्या बिया किंवा तेलाचा वापर करणे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

 कारण कालौंजीमध्ये विविध पोषक घटक असतात ज्यांचा आपल्या शरीरावर आणि सौंदर्यावर चांगला फायदा होतो.

 जगभरात आढळणाऱ्या विविध हर्बल वनस्पती पैकी कालौंजी ची वनस्पती एक आहे. जगभरातील इतिहासामध्ये सर्वात मौल्यवान पौष्टिक समृद्ध औषधी वनस्पती म्हणून कालोंजी च्या वनस्पती ला ओळखले जाते.

 न्यूरोलॉजिकल आणि मानसिक आजार, हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधित विकार, कर्करोग, मधुमेह, दाहक स्थिती, वृद्धत्व, आणि विविध संसर्गजन्य रोगांसाठी कालौंजी खूप फायद्याचे ठरते.

 कालौंजी मध्ये विविध गुणधर्म असल्याने व कालौंजिचे कमी दुष्परिणाम असल्याने सर्वजण कालौंजीचा वापर नेहमीच्या आहारामध्ये करतात.

Kalonji चे उपयोग:

पारंपारिक रित्या Kalonji चा उपयोग मसाला म्हणून केला जातो. ब्रेड ,दही ,स्वास लोणचे आणि सॅलडसच्या यांसारख्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये कोलौंजी चा वापर केला जातो.

कालौंजी के चमत्कारी वनस्पती म्हणून देखील वर्णन केले जाते. तर अनेक हरबल तज्ञाने कालौंजीला ” द‌ हर्ब फ्रॉम हेवन” असे मानले आहे.

त्याप्रमाणेच पैगंबर मोहम्मद यांनी कालौंजिच्या गुणकारी गुणधर्माचे वर्णन ” या काळा बियांचा वापर मृत्यू वगळता प्रत्येक आजारावर उपाय म्हणून केला जातो.”

‘ द कॅनोन ऑफ मेडिसिन’ या पुस्तकाचे जनक डॉक्टर अव्हिसेंना जपनी शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी Kalonji बियाण्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

शरीरातील थकवा कमी करण्यासाठी कालौंजी च्या बिया वापरतात.

Kalonji च्या बियांचा उल्लेख पवित्र ग्रंथ “बायबल” मधील औषधी गुणधर्मा मुळे देखील केला गेला आहे.

Kalonji मध्ये असलेली पौष्टिक तत्वे;

कालौंजी मध्ये असलेल्या‌ पौष्टिक तत्त्वांमुळे कालौंजी चा वापर शरीरासाठी आरोग्यदायी ठरतो.

कालौंजिच्या बियांमध्ये अमिनो ऍसिड, प्रोटिन्स ,कार्बोहायड्रेट‌, आवश्यक तेल, विटामिन्स, फायबर्स, सॅपोनिन इत्यादी घटक असतात. घटकातील कार्बोहायड्रेट्स मधील ग्लुकोज, मोनोसॅक्हेराइड, अरबीनोज झायलोज इत्यादी घटक असतात. त्याचप्रमाणे यामध्ये लोह ,कॅल्शियम, फॉस्फरस, तांबे, पोटॅशियम आणि सोडियम मात्रा सुद्धा असते.

स्वयंपाकामध्ये कालौंजीचा वापर खूप कमी प्रमाणात करतात. कालौंजी च्या बिया चा वापर हा तेल म्हणून एखादा सप्लीमेंट्स प्रमाणे केला जातो. कारण या बियांच्या तेलांमध्ये पोषकद्रव्ये असतात.

Kalonji फायदे :

कालौंजी च्या बियांमध्ये आणि तेलांमध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्य असते त्यामुळे यांचे सेवन केल्याने आपले आरोग्य सुधारते. आरोग्य संबंधी च्या अनेक समस्या वर कालौंजी हे एक रामबाण उपाय आहे. मुळे कालौंजी चे बरेच फायदे आहेत ते पुढील प्रमाणे:

1. मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते:

कालौंजी चा वापर आपल्या रोजच्या आहारामध्ये केल्याचा आपल्या शरीरासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. अशावेळी नैसर्गिक रित्या मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी कालौंजी फायदेशीर ठरतात.

मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने कलौंजीचे तेल ब्लॅक टी सोबत अनियमित सकाळी घेतल्यास मधुमेह नियंत्रित राहण्यात मदत होते.

2. यकृताचे आरोग्य सुधारते:

आज-काल चुकीचे औषध उपचार, धूम्रपान, मध्यपान यांच्या सेवनामुळे अनेकांना यकृता संबंधीच्या समस्या उद्भवत आहेत. अशा व्यक्तींसाठी कालौंजी एक प्रकारचे वरदान ठरू शकते. अलीकडे झालेल्या एका संशोधनानुसार असे दिसून आले की कालौंजी च्या बिया आणि तेल हे आरोग्य साठी खूप फायदेशीर ठरते.

3. वजन कमी करण्यास मदत होते:

ज्या लोकांना लठ्ठपणा किंवा वजन कमी करायचे असेल. त्या लोकांनी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबू सोबत कालौंजी च्या बियांची थोडी सी चूर्ण टाकल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

अनेक तज्ञांच्या मते, कालौंजी हे वजन काढण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

4. डोकेदुखी कमी होते:

प्रत्येकाच्या जीवनामध्ये काळजी, तणाव यामुळे डोकेदुखीच्या समस्या अलीकडे फार वाढलेल्या दिसत आहेत. परंतु अशा वेळी सतत डोकेदुखीच्या गोळ्या घेणे हे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी कारंजे च्या बियाचे तेल कपाळाला लावल्यास डोके दुखी तुरंत थांबते. काही मिनिटांमध्ये तुम्हाला आराम मिळेल.

5. रक्तदाब नियंत्रित राहते:

ज्या लोकांना रक्‍तदाबाचा त्रास आहे त्यांनी रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये कालौंजिच्या बियांचे तेल पिल्यास रक्‍तदाबाचा त्रास लगेच कमी होतो. त्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रित होऊ शकते. एवढेच नसून जास्त रक्तदाबाचे समस्या असल्यास त्या व्यक्तीने रोजच्या आहारामध्ये कालौंजी बिया चे सेवन केल्यास नक्कीच फायदा होतो.

6. सांधेदुखीचा त्रास कमी होतो:

सांधेदुखीवर घरगुती उपाय म्हणजे कालवून जिहा आहे. मूठभर कालौंजीच्या बिया तिळाच्या तेला सोबत गरम केल्यास ते तेल सांधेदुखीच्या ठिकाणी लावल्यास सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना, दाह कमी होण्यास मदत होते.

7. रोगप्रतिकार शक्ती वाढते:

रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध, कालौंजी चे तेल पिल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यासोबतच रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते.

8. दात मजबूत होतात:

दात दुखी, हिरड्या मध्ये आलेली सूज, दातातून येणारे रक्त अशा समस्या वर उपाय म्हणजे कालौंजी. त्यामुळे दिवसातून दोन वेळा कलोंजी तेल हिरड्याला लावून घासल्यास दात मजबूत होतात.

9. पिंपल्स पासून सुटका मिळते:

महिलांना चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ऐक्णे असेल अशा वेळी कालौंजी वापर करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये कालौंजीचे तेल घालून चेहराला मालिश केल्यास चेहऱ्यावरचे पिंपल्स जाऊन चेहरा चा रंग खुलतो.

FAQ कलौंजी बद्दल विचारलेले काही प्रश्न :

1. Kalonji ला मराठी मध्ये काय म्हणतात?

उत्तर : कलौंजी ला मराठी मध्ये मंगरेला असे म्हणतात.

2. कालौंजी चा वापर आहारामध्ये कसा करावा?

उत्तर: कालौंजी चा वापर आहारामध्ये मसाला म्हणून केला जातो. त्यासाठी कालौंजीच्या बिया थोड्याशा भाजून घ्याव्यात आणि त्या वाटून त्याचा वापर अन्नातील स्वाद वाढविण्यासाठी मसाला म्हणून करावा.

3. उपाशीपोटी कालौंजी खाणे हितकारक आहे का?

उत्तर : होय, आपण कालौंजी उपाशीपोटी खाऊ शकतो. कारण अनेक तज्ञांच्या मते, कारण कालौंजी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कालौंजी चे तेल उपाशीपोटी, जेवण्यापूर्वी खाण्याचा सल्ला दिला जातो.

4. कालोंजी च्या बिया कच्च्या स्वरूपात खाणे योग्य आहे का?

उत्तर : होय, कालौंजी च्या बिया कच्च्या स्वरूपात खाल्ल्या तरी काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही कोमट पाणी, अण्णा पदार्थातून कालौंजिचे सेवन करू शकता.

5. कालौंजी चा मराठी अर्थ?

उत्तर : कालौंजी म्हणजे मराठीमध्ये काळे बियाणे. हे काळे बियाणे नाइजेला या औषधी वनस्पतीचे बियाणे आहेत. नायजेला बद्दल असे म्हणतात की, ही कलियुग इं काळातील संजीवनी वनस्पती आहे.

 तर मित्रांनो ! ” कलौंजी म्हणजे काय? आणि कलौंजी चे फायदे । Kalonji in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.

” कलौंजी म्हणजे काय? आणि कलौंजी चे फायदे । Kalonji in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही  पॉईंट्स राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

Read Also :

 धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *