लोकमान्य टिळक यांच्या विषयी संपूर्ण माहिती । Lokmanya Tilak Information in Marathi

Lokmanya Tilak Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” लोकमान्य टिळक यांच्या विषयी संपूर्ण माहिती । Lokmanya Tilak Information in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

लोकमान्य टिळक यांच्या विषयी संपूर्ण माहिती । Lokmanya Tilak Information in Marathi

भारत स्वातंत्र्यासाठी अनेक महान पुरुषाने महत्वाची कामगिरी बजावली. त्यातील एक म्हणजे ” लोकमान्य टिळक.”

” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वतंत्र आंदोलनाचे पहिले नेता म्हणून ओळखले जातात.

भारत देशासाठी त्यांनी केलेली कामगिरी यामुळे आजही लोकमान्य टिळक यांना आपल्या देशामध्ये अजरामर आहे.

बाळ गंगाधर टिळक हे भारतीय क्रांतिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकील व भारतीय सेनानी देखील होते.

भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेते लोकमान्य टिळक यांना ब्रिटिश अधिकारी” ब्रिटिश अशांततेचे जनक असे म्हणत” यामुळे त्यांना” लोकमान्य” ही पदवी देण्यात आली.

लोकमान्य टिळक यांचा जन्म :

भारतीय स्वतंत्र सेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक म्हणून ओळख असलेले लोकमान्य टिळक हे माझ्या भारतातील एक महान नेते होते.

लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै इसवी सन 1856 मध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यातील चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मूळ गाव कोणते.

लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते तर आईचे नाव पार्वतीबाई टिळक असे होते.

लोकमान्य टिळक यांचे जीवन :

लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी मधील चिखलगाव या गावी झाला. लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधर टिळक हे रत्नागिरी ते प्रख्यात संस्कृत शिक्षक होते.

पुढे गंगाधर टिळक यांच्या बदलीनंतर लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण कुटुंब पुणे येथे आले. बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अतिशय चातुर्य होते. गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडून घरीच झाले.

नंतर चे शिक्षण पुण्यामधील एंग्लो- वर्नाकुलर या स्कूल मधून झाले. त्याच वेळी लोकमान्य टिळकांच्या आईचे निधन झाले. पण त्याने ते निराश झाले नाही आणि आयुष्यात पुढे जात राहिले.

पुढे लोकमान्य टिळक पंधरा वर्षाचे असताना त्यांचा विवाह तापीबाईशी झाला आणि नंतर लोकमान्य टिळकांच्या पत्नींना सत्यभामाबाई म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्यानंतर 1877 मध्ये येथील डेक्कन कॉलेजमधून संस्कृत आणि गणिताची बी.ए पदवी मिळवली. यानंतर लोकमान्य टिळकांनी मुंबईच्या सरकारी महाविद्यालयातून LLB चा अभ्यास केला. आणि त्यानंतर 1879 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना:

लोकमान्य टिळक आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक महान कार्य केले त्यातील एक म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यामागे लोकमान्य टिळक यांचा महत्त्वाचा वाटा होता.

लोकमान्य टिळक यांनी आपल्या महाविद्यालयातील बॅचमेट यांच्यासोबत मिळून आणि थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर व विष्णुशास्त्री चिपुलंकर यांच्यासोबत भारतीय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी शिक्षणास प्रेरित करण्यासाठी, देशातील तरुणांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी आणि शिक्षण गुणवत्ता आणण्यासाठी एकत्र केले.

 त्यानंतर सर्वांच्या विचाराने” डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना” करण्यात आली. त्यानंतर सण 1885 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूल आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज ची स्थापना करण्यात आली.

‘केसरी’ आणि ‘ मराठा’ चे प्रकाशन:

सर्वप्रथम वृत्तपत्र किंवा मासिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाचे कार्य लोकमान्य टिळकांनी केली आहे.

इसवीसन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी ‘ भारतीय जनता आणि लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि स्वतःच्या कारभाराची भावना निर्माण व्हावी आणि त्यांच्या हक्कासाठी लढा द्यावा’ या उद्देशाने ” केसरी आणि मराठा” या दोन मासिकांची सुरुवात केली. ही दोन वर्तमानपत्रे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली.

लोकमान्य टिळक आणि त्यांच्या जीवनात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यांपैकी वर्तमान पत्राची सुरवात हे एक महत्त्वपूर्ण कार्य होते.

लोकमान्य टिळकांचा राजकीय प्रवास:

” केसरी आणि मराठा” या दोन वृत्तपत्रांच्या प्रकाशनानंतर म्हणजेच 1890 मध्ये लोकमान्य टिळक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यानंतर टिळकांनी स्वराज्य पक्षाविषयी पक्षाच्या उदारमतवादी विचारांना तीव्र विरोध केला.

या दरम्यान लोकमान्य टिळक म्हणले की,”ब्रिटिश सरकार विरुद्ध सध्या घटनात्मक आंदोलन करणे व्यर्थ आहे.” त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन नेते यांना ब्रिटिशांच्या विरुद्ध उभे केले.

लोकमान्य टिळक यांना ब्रिटिशांशी लढण्यात आणि त्यांना पळवून लावण्यासाठी जोरदार बंड करायचे होते. परंतु त्याच वेळी त्यांनी स्वदेशी चळवळीचा आणि बंगालच्या फाळणी च्या वेळी ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार घालण्यात समर्थन मिळाले.

काँग्रेस पक्ष आणि लोकमान्य टिळक यांच्यातील विचारसरणीमुळे लोकमान्य टिळक यांना काँग्रेसचा चिरमपंती विंग गणून मान्यता मिळाली. परंतु यावेळी बंगालचे राष्ट्रवादी बिपिनचंद्र पाल आणि पंजाबचे लाला लजपत राय यांनी लोकमान्य टिळकांना पाठिंबा दिला.

 त्यामुळे या तिघांना “लाल-बाल-पाल” म्हणून प्रसिद्धी मिळाली. खरा तर त्यांना मिळालेली ही प्रसिद्धी आजही आजरामर आहे.

पुढे 1907 मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेस पक्षाच्या उदारमतवादी आणि चिरम पंथी गटात वाद निर्माण झाल्याने काँग्रेस पक्षाची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली.

सार्वजनिक उत्सवाची सुरुवात:

राजकीय जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी इसवी सन 1893 साली “सार्वजनिक गणेशोत्सव” साजरा करण्यासाठी सुरुवात केली.

त्याच वेळी महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक शिवजयंतीला एक प्रमाणात लोकप्रियता मिळाली.

शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हा या सण साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट होते.

लोकमान्य टिळकांचा तुरुंगवास:

 लोकमान्य टिळक यांनी जीवनामध्ये सहा वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध असलेला  दडपणाला विरोध म्हणून महत्त्वाचे पाऊल उचलले. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या वर्तमानपत्राद्वारे ब्रिटिशांविरुद्ध चेतावनी खोर लेख लिहिले. त्यामुळे ब्रिटीश सरकारने लोकमान्य टिळक यांना सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली.  त्यावेळी त्यांना मंडालेच्या तुरुंगात नेण्यात आले. याच मंडलेचा तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांनी ” गीतारहस्य” हा ग्रंथ लिहिला.

 8 जून 1914 रोजी टिळक ब्रिटिशांच्या तुरुंगातून सुटले. यावेळी काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी खूप प्रयत्न केले, परंतु  त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

 त्यामुळे टिळकांनी एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच “होमरूल लीग” असे म्हणतात.

 होम लीगचे मुख्यत्वे हे “स्वराज्य प्राप्ती” असे होते.

होमरूल लीगची स्थापना:

 1915 नंतर तुरुंगवासाची बुक शिक्षा भोगल्यानंतर, लोकमान्य टिळक पुन्हा भारतात परतले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि पहिल्या महायुद्धानंतर राजकीय परिस्थितीही खूप बदलत चालली आहे.

 यानंतर लोकमान्य टिळक पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये परतले. आपल्या साथीदाराबरोबर पुन्हा एकत्रीत  येतो त्यांनी 28 एप्रिल 1916  रोजी होमरूल लीगची स्थापना केली. होम  रुलर लीगचे मुख्य उद्दिष्ट   स्वराज्य प्राप्ती होते.

 या होमरूल लीग मध्ये एनी बेसेंट, मोहम्मद अली जिन्नाह, यूसुफ  बैप्टिस्टा, पंचशील करार केला. या करारामध्ये स्वराज्य आणि प्रशासकीय सुधारणासह  भाषिक प्रांताची

 स्थापना करण्याची मागणी केली गेली.

लोकमान्य टिळक यांचे आणखी काही महत्त्वाची कार्य:

 लोकमान्य टिळक यांनी यांच्या जीवनामध्ये अनेक काही महत्त्वाचे कार्य केले. त्याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे आहे:

1. लोकमान्य टिळक यांनी 1880 साली  पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

2. त्यानंतर,1881 साली लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी “केसरी आणि मराठा” या दोन मासिकाचे निर्मिती केली.

3. 1884 सांली  पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. वा 885 सा साली पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.

4. ब्रिटिशांविरुद्ध लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

5.  1908 मध्ये राजद्रोहाचा आरोप लावून ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांना  सहा वर्षाचा तुरुंगवास केला. या तुरुंगवासात लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

6. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा यासाठी टिळकांनी प्रयत्न केले.

7. लाल-बाल-पाल या त्रिमूर्ती पैकी लोकमान्य टिळक एक होते.

8. लोकमान्य टिळक यांनी समाजसुधारणा करण्यासाठी भर दिला. त्यांनी समाजातील जाती व्यवस्था, बालविवाह या सर्व दुष्कर्म विरुद्ध आवाज उठवला आणि महिलांच्या शिक्षण आणि विकासावर विशेष भर दिला.

लोकमान्य टिळकांचा मृत्यू:

 जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेचा लोकमान्य टिळका वर   खोलवर परिणाम झाला आणि यानंतर त्यांची प्रकृती खराब होऊ लागली. व लोकमान्य टिळक हे मधुमेहाच्या त्रासाने ग्रस्त झाले. त्यामुळे त्यांची परिस्थिती अधिकच खराब झाली.

 त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी 1 ऑगस्ट 1920 रोजी अकर्ता श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे देशभरात सर्वत्र शोककळा पसरली.

 तर मित्रांनो ! ” लोकमान्य टिळक यांच्या विषयी संपूर्ण माहिती । Lokmanya Tilak Information in Marathi”  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

“लोकमान्य टिळक यांच्या विषयी संपूर्ण माहिती । Lokmanya Tilak Information in Marathi”  मध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

Read Also :

 धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *