माझा आवडता खेळ निबंध कबड्डी

माझा आवडता खेळ निबंध कबड्डी [500 words]

माझा आवडता खेळ निबंध कबड्डी
माझा आवडता खेळ निबंध कबड्डी [Image Source: LiveMint]

आपला भारत देश अनेक खेळामध्ये प्रसिद्ध आहे. क्रिकेट, खो- खो, कबड्डी, टेनिस,बॅडमिंटन, फुटबॉल, हॉलीबॉल,असे अनेक प्रकारचे खेळ हे खेळण्यात येतात. त्यामधला च एक कबड्डी खेळ. भारतामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळल्या जातात. त्यापैकी काही खेळ हे बौद्धिक दृष्ट्या, चांगले असतात. तर काही मानसिक, शारीरिक विकास साठी चांगले असतात. या खेळामधून व्यायाम, शरीराला चालना मिळते. हातापायांची हालचाल होऊन शरीरावरचा ताण कमी होतो. तसेच वजन कमी करायला पण खूप उपयोग होतो. म्हणून खेळांना खूप महत्व आहे.

आताच युग हे स्पर्धात्मक युग आहे. आणि अशा या युगातच खेळण्याचे मैदान कमी झाले. आजकाल मुलं खेळताना खूप कमी दिसतात. ऑनलाईन गेम खेळण्यात ही मुले व्यस्त असतात. आज काल सर्वच मुलं हे तासनतास मोबाईल वर गेम खेळतात. आज काल मैदानात खेळले जाणारे खेळ हे खूप कमी दिसत आहेत. व्यायामाच्या अभावामुळे आपल्याला मुलांमध्ये अनेक दुष्परिणाम देखील दिसत आहेत. याना जर दूर ठेवायचे असल्यास मुलांना मैदानी खेलाच महत्व हे समजायला पाहिजे. त्यांना हे खेळ खेळण्याा करता योग्य प्रोत्साहन दिले पाहिजे.

कबड्डी हा खेळ तस बघितलं तर फार पारंपरिक आहे. या खेळाची सुरुवात कुठे व कसे झाले हे अजूनही माहिती नाही. परंतु काही शोधानंतर असे लक्षात आले की, या खेळाची सुरुवात अभिमन्यूने केली. भारतात सुमारे कित्येक वर्षांपासून हा खेळ खेळला जात आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या खेळाला अनेक नावांनी ओळखले जाते. आज कबड्डी हा खेळ खूप प्रसिद्ध असा खेळ आहे.

अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेचे चौथे अधिवेशन 1931 साली महाराष्ट्रातील अकोला येथे पार पडले. भारतातील देशी खेळांचे नियम ठरविण्यासाठी या अधिवेशनात एक समिती नेमण्यात आली. भारतातील देशी खेळांचे नियम या समितीने तयार केले पुढे 1937 ला नाशिक येथे पार पडलेल्या अधिवेशनामध्ये या नियमांना मान्यता देण्यात आली.

पुढे या खेळाचा समावेश ऑलिंपिक संघटनेने कबड्डी चा समावेश राष्ट्रीय खेळात केला. महाराष्ट्राने ने नियम सर्व खेळांसाठी लागू केले होते तेच नियम कबड्डी साठी सुद्धा लागू केले. पूढे हा खेळ सर्वत्र खेळाला जाऊ लागला, या खेळाला खूप प्रसिध्दी देखील मिळाली. हा खेळ आंतरराष्टरीय स्तरावर पोहचवण्या मागे महाराष्ट्रचा खूप मोठा हात आहे.

माझ्या घराजवळच्या मैदानात हा खेळ आम्ही लहानपणी नेहमी खेळायचो. खूप मनोरंजन व्हायचं. आणि शरीराचा चांगला व्यायाम देखील होत होता. या खेळाला जास्त सामना लागत नाही. मला कबड्डी खेळायला खूप आवडते. मला शाळेत असताना आमच्या टीम ला पारितोषिक देखील मिळालेली आहेत. शाळेतला हा सामना जिल्हास्तरीय होता. त्यामुळे शाळेचे खूप कौतुक तर झालेच, शिवाय आमचे खूप झाले.

पण खूप कौतुकाची गोष्ट अशी आहे की, कबड्डी या खेळा मध्ये महिला व पुरुष दोन्ही पण खेळतात. दोघांना समान असा दर्जा दिला जातो. नियम हे सारखे असतात. व या खेळामध्ये दोघांनी विश्वकप पण जिंकला आहे. हे फक्त याच खेळात पाहायला मिळालं.

हा खेळ आता पुरुष आणि महिला दोन्ही पण खेळू लागले आहेत बारा 12.50 ग 10 मी व महिलांना 11मी ग 8मी मैदान लागते. हे मैदान आयाताकृती असून या मैदानात बारीक चाळलेली माती व शेणखत याचा उपयोग करून मैदान हे सपाट व मऊ केलेलं असतं . काळाच्या वाढत्या वेगानुसर आता खेळ चटई बवर पण खेळाला जातो.

कबड्डी या खेळाचे अनेक फायदे देखील आहेत. या खेळाने शरीर निरोगी व स्वास्थ्य देखील चांगले राहते तसेच आपली निर्णय घेण्याची निर्णय क्षमता वाढते कबड्डी हा सामूहिक खेळ आहे. त्यामुळे एकमेकांबद्दल आत्मीयता निर्माण होते. व तसेच चतुराई, सामर्थ्य, जिद्द वाढते. व एखादी गोष्ट करण्याची हिम्मत वाढते.

“माझा आवडता खेळ निबंध कबड्डी” वाचल्याबद्दल धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.