माझी शाळा निबंध मराठी | इयत्ता आठवी, पाचवी

 ” नमस्कार माझा ह्या ज्ञान मंदिरा…सत्यम शिवम सुंदरा”

 खरोखरच शाळा ही प्रत्येक लहान मुलांच्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका बजावत असते.कारण हे प्रत्येक मूल घरातल्या छोट्याशा दुनियेत असतात. त्यांना बाहेरच जग हे शाळा दाखवते. म्हणून आपल्या जीवनात शाळेचे महत्व हे खूप राहते.माझ्या जीवनात माझ्या शाळेला खूप महत्त्व आहे.

 शाळा हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते बालवाडी पासून ते १० पर्यंत शिक्षण घेतलेल्या शाळेचे. शाळा हे ऐक शैक्षणिक केंद्रबिंदू आहे. शाळा हा आपल्या शिक्षणाचा मूळ पाया आहे. शाळेपासून आपल्या प्राथमिक शिक्षण मिळत .आपल्या जडण घडणाची सुरवात शाळेपासून होते.तसेच आपल्या व्यक्तिमत्व विकासाची ती पहिली पायरी असते.आपला सर्वांगीण विकास चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी शाळा उत्तम कार्य करते. याच शाळे मध्ये मुलांना नवनवीन गोष्टी शिकवल्या जातात. तसेच मुलांना नवीन काही करण्याची संधी मिळते.या शाळेमुळेच. मुलांचा बौध्दीक विकास, नैतिक विकास, सर्वांगीण विकास,सामाजिक विकास, शारीरिक विकास, होतो. स्वतः ला सिध्द करण्याची संधी देखील शाळेतच मिळते.

 माझी शाळा ही गावाच्या मधोमध असणारी सुंदर ,सुसज्ज ,देखणी अशी तीन मजली इमारत आहे.शाळेचे नाव ‘सहकार विद्या मंदिर’, माझ्या घरापासून माझी शाळा जास्त दूर नाही. शाळेत मराठी आणि इंग्रजी असे दोन शिक्षण पद्धती आहेत. खरच माझी शाळा संस्कारच माहेरघर आहे.अस म्हणायला हरकत नाही. आज पण शाळेचे दिवस आठवल्यानंतर मागच्या आठवणी ताज्या होतात. माझ्या शाळेची इमारत खूप मोठी होती त्यांमध्ये सर्व ४२ खोल्या होत्या . सर्वच खोल्या ह्या स्वच्छ , सुसज्ज आहेत.तसेच शाळेत दोन ऑफिस, वाचनालय प्रयोगशाळा ,संगणक कक्ष व स्टाफ रूम आहेत. ऑफिस ची रचना सजावट ही खूप छान होती.शाळेचे मुख्यद्यापक हे खूप प्रेमळ कर्व्यदक्ष आहेत. शाळेतल्या सर्वच रूम ह्या स्वच्छ. हवेशीर चांगल्या प्रकारच्या व्यवस्थेने सुसज्ज होत्या. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय ही खूप चांगल्या पद्धतीने केली होती .प्रत्येक वर्गामध्ये पंखे ,लाईट ची व्यवस्था आहे .तसेच आजच्या टेक्निशयन युगात शाळेत ८ डिजिटल क्लास रूम आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल शिक्षण देणं, ही काळाची गरज बनली आहे.प्रत्येक मुलाला डिजिटल शिक्षण मिळायला पाहिजे अशीच शाळेची तळमळ होती. भव्य मोठं पटागण आहे. मधल्या सुट्टीत आम्ही सर्वच तिथं खेळायचो.

 शाळेत आम्हाला मिळालेलं शिक्षण हे लाख मोलाचं आहे. शाळेत खूप छान अशी प्रयोगशाळा होती. त्यात तर आम्हाला आमचे विज्ञान चे सर प्रयोग शिकवायचे.तसेच सर्व रसायन बद्दल खूप चांगली माहिती सांगायचे . शाळेतील सर्वच शिक्षक हे मनमिळावू स्वभावाचे समजून सांगणारे होते.आणि अभ्यास नाही केला तर शिक्षा करणारे देखील होते.शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडे होती. तसेच अशोकाची, पिंपळाची झाडे होती.थोड पलीकडे एक सुंदर छोटंसं बगीचा पण होता. त्या गार्डन मध्ये बसल्या नंतर छान, प्रफुल्लित वाटायचं .आम्ही त्या झाडांना आमच्या स्पोर्ट पिरेड मध्ये त्यांना पाणी घालायचो. आज बघितलं तर ती झाडे खूप उंच छान घनदाट झाली आहे.

 शाळेचं व्यवस्थापन हे खूप छान होत. शिक्षणाच्या बाबतीत माझ्या शाळेचे एक उच्च स्थान आहे.माझी शाळा ही आदर्श शाळा मानली जाते. शाळेतले सर्वच विद्यार्थी हे चांगल्या गुणांसह पास होतात..शाळेतील सर्वच शिक्षक त्यांच्या प्रगतीची नोंद ठेवतात. आज इंटरनेट चे महत्व येवढे वाढलेले आहे की सर्वच शाळांमध्ये संगणक का बद्दल शिक्षण देणे महत्वाचे झाले आहे. शाळेत शिक्षक दिन,मराठी दीन, थोर विचारवंताचे जयंती, शाळेत साजरे केले जातात. यामुळे आपल्या मध्ये धैर्य, चिकाटी, प्रामाणिकपणा , वागणूक हे गुण विकसित होतात.

. शाळेत एक प्रशस्त सभागृह होत.तिथं आमचे सर्व कार्यक्रम होत.तसेच वर्षातून एकदा येणारा स्नेहसमेलन चा कार्यक्रम त्या सभागृहात व्हायचा. शाळेत एक सर्व मुलांच्या वाचनासाठी वाचनालय होत. त्यात सर्व प्रकारचे पुस्तक, कादंबरी, नाटक,कथा, पटकथा संवाद, अशी अनेक प्रकारची पुस्तके होती. शाळेत २२ शिक्षक १८ शिक्षिका होत्या .शाळेचे सर्वच शिक्षक हे मन लावून शिकवत. वर्गातल्या एका मुलाला तो मुद्दा समजे पर्यंत समजून सांगत . शाळेचीरचना ही खूप सध्या पद्धतीनं केलेली होती. माझ्या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. माझ्या शाळेची दरवर्षी सहल जात होती.सर्वच शिक्षक सर्वांना सहली करता प्रोत्साहित करत.शाळेत इतर खेळांचे शिक्षण पण दिले जात होते, शाळेत अनेक प्रकारच्या स्पर्धा होत असल्यामुळे मुलांना खूप पारितोषिक पण मिळत.मला पण माझ्या शाळेत खूप पारितोषिक मिळालेली आहेत. माझे खूप मोठे भाग्य आहे की मला अशी छान शाळा मिळाली.

. माझी शाळा मला खुप आवडते.मला कधीच शाळेत जायचा कंटाळा आला नाही. माझी शाळा ही खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध देखील होती. शाळेत पूर्ण विद्यार्थी संख्या ही १००० आसपास होती. काही विद्यार्थी हे बाहेरगावचे होते तर काही गावतलेच होते.बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्याना बसेस ची सोय होती.शाळेत येण्याकरता त्रास होऊ. नये म्हणुन, त्यांना त्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. खेड्यातल्या मुलांना शिक्षणाची योग्य सोय नसल्या मुळे ते माझ्या गावाला शिकायला येत.सर्वांना शिक्षणाची योग्य संधी मिळावी,सर्वांना शिक्षण योग्यरीत्या मिळावं म्हणून माझ्या शाळेने शिक्षणाच्या सर्वच सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.

माझ्या शाळेने मला खूप काही दिलं.योग्य संस्कार. प्रामाणिकपणा, समज, ज्ञान, कर्तृत्व शिस्त.अस खूप काही.मला माझ्या शाळेचं खरच खूप अभिमान वाटतो. आज माझ्या गावातली खूप काही मुलं शहरात उच्च शिक्षण घेत आहेत. माझ आजच सर्व श्रेय आज माझ्या शाळेला जाते. आज एक चांगला नागरिक होण्यासाठी व्यक्तिमत्व घडण्याकराता शाळेचं योगदान खूप मोठं राहते.प्रत्येक विद्यार्थ्याची त्या शाळे वर एक जबाबदारी राहते. त्यांना योग्य वळण लावण्याचं शिस्तशिर बनवायचं.

 माझ्या शाळेबददल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. पण त्या शाळेमधल्या आठवणी न विसरता येण्या सारख्या आहेत. कधी कधी तर शाळेची आठवण आली तर डोळ्यात पाणी देखील येत.माझ्या शाळेत उत्तीर्ण विद्यार्थ्याचा दरवर्षी गौरव केला जात असे . त्यामुळे मुलांना अभ्यास करायला प्रेरणा मिळायची,उत्साह यायचा. अभ्यास करण्याची जिद्द वाढायची.आज प्रत्येक विद्यार्थ्याला अशीच शाळा मिळायला हवी. अशी अपेक्षा आहे. माझ्या शाळेची फी सामान्य माणसाला परवडेल अशी होती. कारण प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे.शाळेतील प्रत्येक शिक्षक वृंद मुलांना योग्य शिस्त,प्रामाणिकपणा शिकवतो.त्यातून विद्यार्थी हा घडत असतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जडण घडणीत शिक्षकांचा महत्वाचा वाटा असतो.त्याच्या सर्व कामगिरीचा श्रेय हे शाळेला आणि शिक्षकांना जात.

 आज कोरोना सारख्या काळात शाळाच बंद पडल्या. आज सर्व ठिकाणी ऑनलाइन शिक्षण चालू आहे. प्रत्यक विद्यार्थी हा घरी बसून शाळेची कमी पूर्ण करत आहे. पण या ऑनलईन पद्धतीतून शिक्षण मुलांपर्यंत पोहचत का? काही ठिकाणी तर नेटवर्क नसल्यामुळे मुलांना शिक्षण घेता येत नाही.पण त्या शाळेसारखं शिक्षण अशा ऑनलाईन पद्धतीने नाही मिळत. अशा शिक्षणामुळे मुलांची मानसिकता नाही राहली, पण कसं तरी का होईना मुलां पर्यंत शिक्षण पोहचत आहे हे महत्त्वाचं……

 पण त्या शाळेची ती मज्जा. वर्गात केलेली मस्ती , सर्व मुलांनी एकत्र खाल्लेले टिफीन ,एकाच टिफीन मध्ये जेवण केलेलं , शाळेच्या पटांगणात खेळलेले ते दिवस , मित्रमैत्रिणी सोबत केलेली भांडणे, वर्गात एकमेकांची घेतलेली पेन्सिल खोडरबर , शिक्षकांनी वर्गात विचारलेल्या प्रश्नांची न येणारी उत्तर , त्यातून मिळालेली शिक्षा, अभ्यास न केल्यावर मिळालेला शिक्षकांचा ओरडा, फळा स्वच्छ करण्या करता चाललेली प्रत्येक विद्यार्थ्यांची तळमळ, येतील का हे सर्व दिवस या ऑनलाइन शिक्षणातून…..

 आता एकच विनंती आहे कोरोना लवकरात लवकर संपवू दे….आणि कोरोणा ची हाणामारी लवकर संपू दे, आणि पहिल्या सारखं सर्व मुलांना शाळेत जाऊ दे… सर्वांना शाळेचं महत्व समजू दे…..प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शाळेच्या आठवणी सजवायला मिळू दे…. शाळेत जाऊन शिकण्याची जे आवड आहे, मज्जा अस घरी बसून शिक्षणात नाही………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *