वेळेचे महत्व वैचारिक लेखन

आपल्या जीवनात सर्वच गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ आहे. वेळ ही खूप शक्तिशाली आहे. कोणीच वेळे समोर जाऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने वेळेला महत्त्व दिलेच पाहिजे. वेळेचा सदुपयोग हा प्रत्येक व्यक्तीने करायलाच हवा. वेळेचा गैरवापर नाही केला पाहिजे. कधी कधी तर जिंकण्यासाठी एक क्षण पण पुरेसा असतो. काहीवेळा जिंकण्यासाठी संपूर्ण आयुष्य निघून जाते. आपल्या जीवनात वेळेला खूप महत्त्व दिले गेले आहे. जो व्यक्ती वेळेचा चांगल्या प्रकारे उपयोग करतो तो जीवनात यशस्वी होतो. असं म्हणतात की आयुष्यात आपण पैसा केव्हा पण मिळवू शकतो, पण गेलेली वेळ ही परत आणू शकत नाही. मनुष्यने जर आपल्या वेळेचा जीवनात दुरुपयोग केला तर त्याचे जीवन निरर्थक होते. व त्याला दुःख आणि गरीबी शिवाय काहीच मिळत नाही. त्याला जीवनात नेहमी अपयशच मिळत राहते. कोणीही एका क्षणात श्रीमंत होऊ शकत नाही. आणि कोणी गरीब पण एका क्षणात होत नाही. जीवन आणि मृत्यू यांच्यात फरक एका क्षणाचा असतो.

प्रत्येक क्षण आयुष्यात नवीन एक संधी घेऊन येत असतो. म्हणूनच आलेल्या चांगल्या संधीचे आपण सोन केलं पाहिजे. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. एकदा हा माणसाला लागला तर तो व्यक्तीच्या जीवन च नष्ट करतो. मग त्या व्यक्तीला वेळ निघून गेल्यावर वेळेचे महत्त्व समजते. त्याला असं वाटतं की आपण आपला वेळ फुकट घालवला. आपली सर्व कामे ही वेळेतच पूर्ण करायला हवीत. वेळ हा हिऱ्या प्रमाणे मूल्यवान असतो. त्याचा योग्य उपयोग केला तर त्याच मोल अनमोल आहे. गेलेली वेळ ही परत येऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने वेळ चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे व आपले सर्वच कामेही वेळेत केले पाहिजे व त्याच बरोबर आपल्याला शिस्त लावून घेतली पाहिजे. कॉलेजला किंवा शाळेला ऑफिसला जाताना घरातील सर्व कामे वेळेत केली पाहिजे. वेळेवर उठणे, झोपने, वेळेवर आहार घेणे ठरलेली कामे वेळेत करणे गरजेचे आहे.

असं म्हटलं आहे की “कल करे सो आज कर” याचा अर्थ असा होतो की, आपली जी कामे असतात ते उद्यावर न ढकलता, ती आत्ताच करून घेतली पाहिजे. व उद्याची कामेही आजच करुन घेतली पाहिजे व आताची कामे सध्या केली पाहिजे. जर आपण सर्व कामे वेळेआधीच पूर्ण केलीत तर आपण तणावमुक्त राहतो. आपल्यावर ओझे राहत नाही. एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसा आहे आणि ती व्यक्ती जगातील कुठलीही वस्तू विकत घेऊ शकत असेल आणि वेळ निघून गेलेली असेल तर ती व्यक्ती वेळ काहीही विकत घेऊ शकत नाही. वेळ हा कधीही मागे जात नाही. तो पुढे सरकतो. एखाद्या व्यक्तीने वेळेचे महत्व नाही समजले तर ते वेळ देखील व्यक्तीचे महत्व समजत नाही. वेळ कधीच कुणाची प्रतीक्षा करत नाही.

जर प्रत्येक व्यक्तीने वेळेचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला, तर प्रत्येक व्यक्ती जीवनात यशस्वी होते. आणि तीच व्यक्ती आपले शेवटपर्यंत शिखर गाठू शकते आणि सर्व कामे वेळेत करून आपल्या बरोबर देशाचा, गावाचा, आणि कुटुंबाला देखील विकास करते.

आपल्या देशामध्ये अनेक महान, संत शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी वेळेचा उपयोग करून आपल्या देशासाठी महान कार्य केले वेळ कधीही गरीब-श्रीमंत लहान-थोर उच्च व नीच असा भेदभाव करत नाही. वेळ निपक्षपाती प्रमाणे सर्वांना संधी आणि पुढे जाण्याची संधी देते. वेळ सर्वांना पुढे जाण्याची संधी देते… त्याचे सोने करणे आपल्या हातात असते. असे म्हणतात की काही गोष्टी ह्या वेळेवर केलेल्या चांगल्या असतात. शहरातल्या लोकांचं जीवन हे घड्याळ प्रमाणे असते.

या संपूर्ण जगात वेळेपेक्षा कोणतीही गोष्ट मूल्यवान नाही आहे. वेळ ही सर्वात जास्त मौल्यवान आहे म्हणून प्रत्येकाने वेळेचे महत्त्व समजून त्याचप्रकारे त्याचा योग्य वापर केला पाहिजे जर वेळेचा सदुपयोग केला तर आपण नक्कीच यश मिळू शकतो.

“वेळेचे महत्व वैचारिक लेखन” वाचल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *